अमरावती - विपरित परिस्थितीवर मात करत आयुष सामुद्रे या विद्यार्थ्याने दहावीला ९७.६० % गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. आयुष अमरावतीच्या समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सेमी इंग्रजीच्या 'ड' श्रेणीत शिकत होता. आजपर्यंत फक्त 'अ' श्रेणीतील विद्यार्थी प्रथम क्रमांक घेत होते. पण प्रथमच 'ड' श्रेणीतील विद्यार्थाने शाळेतून प्रथम येत शाळेच्या इतिहासात यशाचा ठसा उमटवला.
'ड' श्रेणीतील मुले 'ढ' नसतात; रिक्षा चालकाच्या मुलाने दहावीत मिळविला पहिला क्रमांक
अभ्यासातील सातत्य कायम ठेवत, जिद्द व चिकाटी ने आयुषने १० वीत ९७.६० टक्क्ये गुण मिळविले. आपल्या मेहनतीचे श्रेय आयुष त्याच्या आई-वडिलांना देतो.
आयुषचे वडील रिक्षा चालवतात. तर आई कामाला जाते. त्याच्या घरची परिस्थिती बेताचीच आहे. अशा परिस्थितीतूनही आयुषने नेत्रदिपक यश प्राप्त केले आहे. आयुषला लहानपणापासूनच शिक्षणाची गोडी होती व पहिल्या वर्गापासूनच तो अभ्यासात चांगला होता. अभ्यासातील सातत्य कायम ठेवत, जिद्द व चिकाटी ने आयुषने १० वीत ९७.६० टक्क्ये गुण मिळविले. आपल्या मेहनतीचे श्रेय आयुष त्याच्या आई-वडिलांना देतो. आयुषचे आई-वडील त्याच्या कामगिरीने आई-आनंदी आहेत.
दिवसात ३ ते साडे ३ तास अभ्यास करत आपण ही मजल गाठल्याचे आयुष म्हणतो. त्याला नाणे संग्रहाचा छंद असून शिवकालीन व मुगलकालीन काळातील नाणे त्याच्या संग्रही आहेत. भविष्यात सॉफ्टवेअर इंजीनियर व्हायचे आयुषचे स्वप्न आहे. व त्यासाठी आत्तापासूनच तयारी सुरू केल्याचे आयुषचे म्हणणे आहे.