अमरावती -मागील काही दिवसांपासून अमरावतीमध्ये कोरोनाचा फैलाव वाढला आहे.आज तर अमरावतीत कोरोनाचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळाले, गेल्या 24 तासांमध्ये 399 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाकडून देखील उपायोजनांवर भर दिला जात आहे. आज रविवार असल्याने अमरावतीच्या डी मार्टमध्ये मोठी गर्दी झाली होती. परंतु ही गर्दी टाळण्यासाठी सोशल डिन्स्टसिंगवर भर देण्यात आल्याने, मार्टबाहेर ग्राहकांच्या रांगाच रांगा दिसून आल्या.
एकीकडे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी, अमरावतीत मात्र कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज दिवसभरात तबल 399 नवे कोरोना रुग्ण आढल्याने खळबळ उडाली आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात 453 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, 1105 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 25 हजार 294 वर पोहोचला आहे. त्यापैकी 23 हजार 754 जणांनी कोरोनवर मात केली आहे.
महाविद्यालये बंदच