अमरावती - विभागातील पाच जिल्ह्यामध्ये असलेले मोठे, मध्यम आणि लघु असे एकूण ५०९ प्रकल्पात, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ३५ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. तसेच पावसाळा काही दिवसांवर ठेपला आहे. यामुळे यंदाच्या वर्षी अमरावतील विभागात पाण्याची टंचाई होणार नाही. मागील वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या प्रकल्पांमध्ये १४.१५ टक्के इतका साठा उपलब्ध होता.
अमरावती विभागातील सर्वात मोठे जलसाठा प्रकल्प असलेल्या अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणात यावर्षी आजघडीला ५१.१८ इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. मागील वर्षी या धरणात, या काळात १६.४३ टक्के इतका साठा होता. मागील पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षीचा हा जलसाठा सर्वाधिक आहे.