अमरावती - अमरावती शहरातील सर्वच भागात कोरोनाने थैमान घातले असून कोरोनाचा प्रसार रोखण्यास जिल्हा प्रशासन अपयशी ठरते आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 650 वर पोहचला असून नव्या 33 रुग्णांची नोंद झाली आहे.
अमरावतीत नव्या 33 रुग्णांची नोंद ; कोरोनाग्रस्तांची संख्या 650 वर
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 650 वर पोहचला असून नव्या 33 रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील कोरोना रुग्णालयाजवळ असलेले अशोक नगर हे कोरोना हॉटस्पॉट झाले आहे.
शहरातील कोरोना रुग्णालयाजवळ असलेले अशोक नगर हे कोरोना हॉटस्पॉट झाले आहे. या परिसरात शुक्रवारी 8 रुग्ण आढळले असून यामध्ये 72,40, 37 वर्षाच्या तीन महिलांसह 30, 21, 45, 29 आणि 25 वर्षाच्या 5 पुरुषांचा समावेश आहे. तसेच सरस्वती नगर येथील 17 वर्षीय युवती, नवाथेनगर येथील 43 वर्षीय महिला, आदर्श नेहरू नगर येथील 17 आणि 49 वर्षीय पुरुष, जुनी वस्ती बडनेरा येथे 60 वर्षीय महिला आणि 38 वर्षीय पुरुष, दस्तुरनागर परिसरातील मधूबन ले आउट येथील 58 आणि 38 वर्षाच्या दोन महिलांसह 34 वर्षाच्या पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे.
जेल क्वार्टर परिसरातील विलगिकरण कक्षात असणाऱ्या 55 वर्षाच्या महिलेला कोरोना झाला. चांदणी चौक परिसरातील 50 वर्षीय महिला, भीमनगर येथील 55 वर्षीय पुरुष, आशियाड कॉलनी येथील 57 वर्षीय पुरुष, गजानन नगर येथील 54 वर्षीय महिला, हबिबनगर येथील 34 वर्षीय पुरुष, प्रिय टाऊनशिप येथील 25 वर्षीय महिला आणि 20 वर्षीय युवक, तपोवन परिसरातील योगीरज नगर येथील 19 वर्षीय युवक, अंजनगाव सुर्जी येथील गुलझारपुरा भागातील 31 वर्षीय महिला, नांदगाव खंडेश्वर ग्रामीण रुग्णालयातील 42 वर्षीय पुरुष, मेळघाटात धारणी येथील 30 वर्षाच्या पुरुषाला कोरोना झाला आहे.