महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बाबासाहेबांच्या नातवाला पंतप्रधान केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही - नामदेव जाधव

बाळासाहेबांना पंतप्रधान होण्यापासून कोणी विरोध केला तर त्याला पेन आणि तलवारीच्या भाषेने उत्तर देऊ. शांततेची शिकवण गौतम बुद्धाने दिली असल्याने आम्ही पहिल्यांदा आक्रमण करणार नाही. पण आक्रमण करणार्‍यांना शिल्लकही ठेवणार नाही,

नामदेव जाधव

By

Published : Oct 10, 2019, 8:30 AM IST

अकोला- ज्यांच्या आजोबांनी या भारताला संविधान दिले, ज्यांच्या आजोबांनी १३० कोटी लोकांचा उद्धार केला, त्यांच्या नातवाला पंतप्रधान केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, अशी घोषणा राजमाता जिजाऊंचे तेरावे वंशज नामदेव जाधव यांनी हजारो बौद्ध बांधवांच्या साक्षीने केली आहे.

जनतेला संबोधन करताना मा जिजाऊचे तेरावे वंशज नामदेव जाधव

अकोला क्रिकेट क्लब येथे आयोजित भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

जाधव पुढे म्हणाले की, बाळासाहेबांना पंतप्रधान होण्यापासून कोणी विरोध केला तर त्याला पेन आणि तलवारीच्या भाषेने उत्तर देऊ. शांततेची शिकवण गौतम बुद्धाने दिली असल्याने आम्ही पहिल्यांदा आक्रमण करणार नाही. पण आक्रमण करणार्‍यांना शिल्लकही ठेवणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. बाळासाहेब आंबेडकर यांना पंतप्रधान करण्याची जबाबदारी ही एसटी, एससी यांचीच नाही तर ती ओबीसी आणि बहुजन समाजाचीही जबाबदारी आहे. म्हणूनच वंचित बहुजन आघाडीचा जन्म झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

७२ वर्षानंतरसुद्धा देशात उपेक्षितांना उपेक्षित ठेवले जात आहे. उपेक्षितांचे, शोषितांचे वंचितपण घालविण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी दोन हात पुढे केले आहे. त्या हातांना हत्तीच बळ देण्याचे काम तुम्ही-आम्ही केले पाहिजे. देशाच्या प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात वंचितांचे मेळावे घेतल्या जातील. देशात २०२४ मध्ये वचितांचे सरकार आणल्या शिवाय राहणार नाही, असे देखील मा जिजाऊंचे तेरावे वंशज नामदेव जाधव यांनी कार्यक्रमात सांगितले.

हेही वाचा-सांगोळा गावात होते रावणाची पूजा; राज्यातील एकमेव मंदिर

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी. जे. वानखडे होते. भन्ते बी संघपाल, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर, अंजली आंबेडकर, अमित आंबेडकर यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे, वंचित बहुजन आघाडी, भारिप बहुजन महासंघाचे पदाधिकारी यासोबतच पाचही विधानसभा मतदारसंघात उभे असलेले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मंचावर उपस्थित होते.

हेही वाचा-मुख्यमंत्र्यांना शेतकरी म्हणजे काय हेच माहीत नाही, शरद पवारांचा टोला

ABOUT THE AUTHOR

...view details