महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गजानन महाराजांच्या पालखीचे अकोल्यात उत्साहात स्वागत

टाळ-मृदंगांचा निनाद, ज्ञानोबा-तुकारामांचा अखंड नामघोष, गजानन महाराजांचा जयघोष, भजनांची मांदियाळी अशा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात शेगावच्या श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा अकोल्यात सोमवारी सकाळी दाखल झाला.

गजानन महाराजांच्या पालखीचे अकोल्यात उत्साहात स्वागत

By

Published : Jun 10, 2019, 6:56 PM IST

अकोला - टाळ-मृदंगांचा निनाद, ज्ञानोबा-तुकारामांचा अखंड नामघोष, गजानन महाराजांचा जयघोष, भजनांची मांदियाळी अशा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात शेगावच्या श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा अकोल्यात सोमवारी सकाळी दाखल झाला. मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालयात जेवण केल्यानंतर ही पालखी मार्गस्थ झाली. या पायदळ वारीमध्ये 600 वारकरी आणि 100 व्यवस्था पाहणारे संस्थांचे सेवाधारी असे 700 लोक आहेत. तसेच या वारीत 2 अश्व, 3 रुग्णवाहिका आणि संस्थानच्या बस आहेत.

गजानन महाराजांच्या पालखीचे अकोल्यात उत्साहात स्वागत

यावेळी भौरद येथील रात्रीचा मुक्काम संपवून गजानन महाराजांची पालखी शहरात दाखल झाली होती. यावेळी पालखीसाठी रस्ते धुवून त्यावर रांगोळीने सजलेले होते. डाबकी रोड मार्गे आलेल्या पालखीचा पहिला मुक्काम मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालय येथे होता. येथे जेवण केल्यानंतर ही पालखी पुढील प्रवासाला निघाली. त्यानंतर डक रोड शिवाजी चौक टिळक मार्गे ही पालखी मुंगीलाल बाजोरिया विद्यालयात सायंकाळी थांबणार आहे. त्यानंतर रात्रीचा मुक्काम करून ही पालखी दुसऱ्या दिवशी शहरातील विविध मार्गांनी मार्गस्थ होते.

पालखीच्या मार्गावर भक्तांना महाप्रसाद, चहा, नाश्ता, शीतपेय, पाणी एवढेच नाही तर बाम व अंगदुखीची औषधेही देतात. या वारीत वारकरी भजन करतात. त्यावर मृदूगाचार्य आणि टाळकरी ठेका धरत शिस्तबद्ध पद्धतीने नाचण्याचा आनंद घेतात.

ABOUT THE AUTHOR

...view details