महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संचारबंदीत केले लग्न; नवरी गेली नवरदेवाच्या दुचाकीवर

१५ एप्रिल रोजी नवरा मुलगा वधू मंडपी हजर झाला आणि ठरल्याप्रमाणे सकाळी ८ वाजता महसूल कर्मचारी व पाच नातेवाईक यांच्या उपस्थित विवाह पार पडला. महत्त्वाचे म्हणजे नवरी मुलगी विवाहानंतर थेट नवरदेवाच्या दुचाकीवरून सासरी गेली.

wedding ceremony in lockdown
संचारबंदीत केले लग्न; नवरी गेली नवरदेवाच्या दुचाकीवर

By

Published : Apr 16, 2020, 7:47 AM IST

अकोला- दीड महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला. १५ एप्रिल रोजी विवाह ठरला. परंतु, अचानक कोरोना विषाणूचे संकट आल्याने संचारबंदी लागू करण्यात आली. विवाह टाळण्याची दोन्ही पक्षाकडील मानसिकता नव्हती. त्यामुळे १५ एप्रिल रोजी नवरा मुलगा वधू मंडपी हजर झाला आणि ठरल्याप्रमाणे सकाळी ८ वाजता महसूल कर्मचारी व पाच नातेवाईक यांच्या उपस्थित विवाह पार पडला. महत्त्वाचे म्हणजे नवरी मुलगी विवाहानंतर थेट नवरदेवाच्या दुचाकीवरून सासरी गेली.

तालुक्यातील गाजीपूर येथील दिलीप फत्तुजी तायडे यांची मुलगी अंकिताचा विवाह, दर्यापूर तालुक्यातील कळशी येथील किसनराव मोटरजी तायडे यांचा मुलगा अंकुश याच्याशी दीड महिन्यापूर्वीच ठरला. १५ एप्रिल विवाहाची तारीख निश्चित करण्यात आली. परंतु, जमावबंदी असल्याने सगळे रितीरिवाज बाजूला ठेवून अगदी साध्या पद्धतीने पाच लोकांच्या उपस्थितीत गाजीपूर येथे विवाह संपन्न झाला. विवाहासाठी नवरा चक्क दोन दुचाकीवरून आपल्या काका व चुलत भावाला घेऊन वधू मंडपी दाखल झाला. तर वधू पक्षाकडून आई, वडील व भाऊ उपस्थित होते. तहसीलदार प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या विवाहासाठी पटवारी संदीप बोळे, सरपंच स्वप्निल तवर, पोलीस पाटील विजय भवाने, कोतवाल सुनील तायडे ही वऱ्हाडी मंडळी उपस्थित होती. यावेळी नववधू अंकिता हिला महसूल विभागाकडून एक सॅनिटायझर बाटली व पाचशे रुपये व सरपंच स्वप्निल तवर यांनी पाचशे रुपये देण्यात आले. विवाहानंतर नवरी नवरदेवाच्या दुचाकीवर बसून सासरी रवाना झाली.

ABOUT THE AUTHOR

...view details