अकोला - जिल्ह्यातील 214 ग्रामपंचायतीच्या मतदानाला आज सकाळी साडेसात वाजता शांततेत सुरुवात झाली. जिल्ह्यात 4 लाख 63 हजार 247 मतदार असून 4 हजार 411 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. 60 निवडणूक निर्णय अधिकारी निवडणुकीचे कामकाज पाहणार आहेत. अकोल्यात असलेल्या 852 मतदान केंद्रांपैकी 220 मतदान केंद्रे हे अतिसंवेदनशील आहेत. याठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अद्यापपर्यंत कुठेही गडबड झाल्याची माहिती नाही. काही मतदान केंद्रावर संथगतीने मतदानाला सुरुवात झाली आहे. अकोला तालुक्यातील दहीगाव गावंडे येथील मतदान केंद्रावर मतदारांनी पहिल्या टप्प्यात मतदानासाठी गर्दी केली.
अकोला ग्रामपंचायत निवडणूक : शांततेत मतदानाला सुरुवात
अकोल्यात 214 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. काही मतदान केंद्रावर संथगतीने मतदानाला सुरुवात झाली आहे. अकोला तालुक्यातील दहीगाव गावंडे येथील मतदान केंद्रावर मतदारांनी पहिल्या टप्प्यात मतदानासाठी गर्दी केली.
राज्यात आज एकूण १४२३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले असून आज सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी राज्यात सर्वत्र मतदानाला सुरुवात झाली. कोरोनाचे संकट ओसरत असताना निवडणूक आयोगाने राज्यात ३४ जिल्ह्यांमधील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास २३ डिसेंबरपासून सुरुवात झाली होती. १८ जानेवारीला मतमोजणी होणार असून अनेत उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये सीलबंद होणार आहे.