अकोलाजिल्ह्यातील उगवा गावात दोन तरुणांनी two youths made video before suicide गळफास घेत आत्महत्या Akola youth suicide by hanging केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. आता या प्रकरणाला वेगळेच वळण आले आहे. आत्महत्या केलेल्या आशिष गोपीचंद अडचुले Ashish Adachule Viral Video वय ३५ वर्षे, राहणार उगवा याचे दोन-तीन व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल Akola youth viral Video before suicide होत आहेत. या व्हिडिओमध्ये त्याने अकोल्यातील अकोट फैल पोलिसांनी Akot Fail Police केस दाबण्यासाठी १ लाख रुपयांसह हप्ते घेतल्याचा आरोप केला आहे. अन् आता या सर्व पोलिसांना आत्महत्येसाठी जबाबदार धरले आहे. न्यायाधीश साहेब, माझा पोलिसांवर विश्वास राहिला नाही, तुम्हीचं लक्ष दया... असे व्हिडिओ बनवत आशिषने Akola youth suicide video viral आत्महत्या केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी शहर पोलीस अधिक्षक सुभाष दुधगावकर यांच्याकड चौकशी सोपवली आहे. Judge Sir, I no longer trust police please pay attention
व्हिडिओत न्यायाधीश, पोलीस व नागरिकांना शिविगाळ केल्याचा दावाअकोट फैल पोलिस ठाण्यात आशिष अडचुले याच्याविरुद्ध ऑक्टोंबर २०२१ मध्ये प्रतिबंधित गुटखा विक्री प्रकरणी कारवाई करण्यात आली होती. त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल केला होता. तसेच त्याच्यावर मारहाण केल्याप्रकरणात भादंवि कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल आहे. व्हिडिओमध्ये त्याने न्यायाधीशासोबतच, पोलीस आणि नागरिकांनाही शिवीगाळ केली आहे. तो व्यसनाधीन असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिस विभागात आधीच नानाविध प्रकरणांमुळे गाजत असताना त्यात या प्रकाराने भर घातली आहे.
काय आहे प्रकरणअकोल्यातील उगवा येथील सुभाष शेषराव भातकुले ३६ वर्षे आणि आशिष गोपीचंद अडचुले ३५ वर्षे या दोघांनी २३ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणात अकोट फैल पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. परंतु आशिषने आत्महत्ये पूर्वी तीन व्हिडिओ तयार केले असून आत्महत्येला अनेक जण जबाबदार असल्याचे म्हटले आहे.