अकोला - शहरात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने आज (दि. 30 मे) दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल चौदा दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी शेख नफिस शेख गफूर व सय्यद फय्युम सय्यद कयूम या दोघांना अटक केली आहे. या दोघांनाही सिटी कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या दोन चोरट्यांच्या मुसक्या, 14 दुचाकी वाहने जप्त
अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून तब्बल 14 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी त्या दोघांना सिटी कोतवाली पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
सिटी कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या खोलेश्वर परिसरामध्ये नितेश धायडे यांची दुचाकी (क्र. एम एच 30 ए जे 737) ही 9 मे रोजी चोरीला गेली होती. याप्रकरणी सीटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत असताना त्यांना गांधी रोड येथे दोघे संशयितरित्या दुचाकी समोर उभे असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेने या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी कसून चौकशी केली असता त्यांनी पोलिसांना 14 चोरीच्या दुचाकी दिल्या. ही वाहने शहरातील विविध ठिकाणांवरून चोरी केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. विशेष म्हणजे, रामदासपेठ पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या परिसरातील 9 दुचाकी त्यांनी चोरल्याचे तपासात समोर आले आहे. या दोघांनाही स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
हेही वाचा -maratha reservation - मराठ्यांचे नेते कमी पडले कारण ते राजकारणात गेले - नरेंद्र पाटील