मोर्णा नदीतील जलकुंभींमुळे परिसरातील नागरिकांना डासांचा त्रास; गंभीर आजाराची भीती
अकोल्यातील मोर्णा नदीमध्ये जलकुंभी वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. याचा नदीकाठच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या डासांमुळे साथीचे रोगांचे प्रमाण वाढले आहे.
अकोल्यातील मोर्णा नदीमध्ये जलकुंभी वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे
अकोला - पावसाळा ऋतू सुरू असल्याने मोर्णा नदीकाठच्या नागरिकांना डासांचा त्रास वाढला आहे. मोर्णा नदीमध्ये जलकुंभी वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. महापालिकाचा आरोग्य विभाग यावर फॉगिंग मशीनने फवारणी करीत असल्याचा दावा करत आहे. मात्र, परिसरातील नागरिकांनी मनपाच्या या दाव्याला फोल ठरवले आहे. त्यामुळे महापालिका आता तरी नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळणार नाही, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.