महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी कावडधारकांनी घेतले राजराजेश्वराचे दर्शन

राजराजेश्वर मंदिरात श्रावणातील प्रत्येक सोमवारी जलाभिषेक उत्सव साजरा केला जातो. राज्यातील भाविक हा उत्सव पाहण्यासाठी हजेरी लावतात.

जलाभिषेक

By

Published : Aug 5, 2019, 1:10 PM IST

अकोला- श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी अकोल्याचे आराध्य दैवत असलेल्या राजराजेश्वर मंदिरात सोमवारी सकाळपासून कावडधारकांनी पुर्णा नदीतून आणलेल्या पाण्याने जलाभिषेक केला. जयभोलेच्या गजरात कावडधारी गांधीग्राम येथून अनवाणी पायाने शहरात पहाटे दाखल झाले.

राजराजेश्वर मंदीर

अकोल्यात श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी हा उत्सव असतो. हा उत्सव पाहण्यासाठी राज्यभरातील भाविक येथे येत असतात. या उत्सवानिमित्त भाविक राजराजेश्वर मंदिरात सकाळपासून दर्शनासाठी रीघ लावतात.

कावडधारकांमध्ये युवकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. मंदिरात रात्री उशिरापर्यंत भाविकांची गर्दी असते. त्यामुळे येथे मंदिराचे सेवाधारी, संचालक मंडळ आणि पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येतो.

ABOUT THE AUTHOR

...view details