महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

हिवरखेड राज्य महामार्गाची दुर्दशा; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

रस्त्यांच्या कामाला सुरुवात न झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता "न भूतो, न भविष्यती" अशा प्रकारचे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

हिवरखेड रस्ता

By

Published : May 13, 2019, 5:31 PM IST

अकोला- हिवरखेड राज्य महामार्गावरील मुख्य रस्त्यावरील डांबर उखडून गेल्याने मातीचा खच रस्त्यावर साचला आहे. यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढलेली असूनदेखील सबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे याकडे संपूर्ण दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

हिवरखेड रस्ता

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी हिवरखेड, चितलवाडी, खंडाळा, कार्ला, सौन्दळा, गोर्धा, झरी बाजार अशा अनेक ग्रामपंचायतींनी आणि रस्ताग्रस्त संघर्ष समिती हिवरखेडद्वारे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. निवेदनामध्ये रस्त्यांच्या खराब स्थितीमुळे होणाऱ्या समस्या मांडण्यात आल्या आहेत. निवेदन दिल्यापासून ७ दिवसाच्या आत हिवरखेडपासून रस्त्यांच्या कामाला सुरुवात न झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता "न भूतो, न भविष्यती" अशा प्रकारचे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

रस्ताग्रस्त संघर्ष समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकार्‍यांना भेटून रस्त्याची भीषण परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून दिली. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाला आंदोलनाचे कोणतेही गांभीर्य सद्यस्थितीत दिसत नसून जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यावरसुद्धा सामाजिक बांधकाम विभागाच्या तेल्हारा, आणि अकोला कार्यालयात कोणतेही संबंधित जबाबदार अधिकारी नागरिकांचे निवेदन स्वीकारण्यासाठी व चर्चेसाठी हजर नव्हते.

ABOUT THE AUTHOR

...view details