अकोला - बारावीत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे अकोटच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अश्विनी गजानन सलामे (वय 18) असे तिचे नाव आहे. शिवाजी महाविद्यालयातील बारावीच्या वाणिज्य शाखेत ती शिकत होती.
कमी गुण मिळाल्याने अकोल्यातीत विद्यार्थिनीची आत्महत्या
अश्विनीला बारावीच्या परीक्षेत ६५० पैकी ३६१ गुण मिळाले. मात्र, अपक्षेपेक्षा कमी गुण असल्यामुळे तिचे समाधान झाले नाही. निकाल लागल्यानंतर दुपारी ३.३० च्या सुमारास तिने बंद खोलीत साडीच्या साहाय्याने घळफास घेऊन आत्महत्या केली.
अश्विनीला बारावीच्या परीक्षेत ६५० पैकी ३६१ गुण मिळाले. मात्र, अपक्षेपेक्षा कमी गुण असल्यामुळे तिचे समाधान झाले नाही. निकाल लागल्यानंतर दुपारी ३.३० च्या सुमारास तिने बंद खोलीत साडीच्या साहाय्याने घळफास घेऊन आत्महत्या केली. ही गोष्ट घरातील लोकांच्या लक्षात आल्यानंतर तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
मृत अश्विनीचे वडील गजानन सलामे हे परभणी एसटी महामंडळात चालक आहेत, तर तिचा लहान भाऊ आणि मोठी बहीण शिक्षण घेत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे. तिच्या आत्महत्येमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.