महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तंत्रज्ञान स्वातंत्र्यासाठी शेतकऱ्यांचा अकोल्यात एल्गार मेळावा

शेती परवडू नये या धोरणासह सिलिंगच्या कायद्यामुळे बहुतांश शेतकरी अल्पभूधारक झालेले आहेत. या 2- 4 एकरांत उदरनिर्वाह शक्य करायचा प्रयत्न करायचा असेल तर शेतीला जागतिक पातळीवरील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे. त्याशिवाय जागतिक पातळीवरील स्पर्धेला तोंड देणे शक्य होणार नाही, असे सांगून ललित बहाळे म्हणाले,  जैवतांत्रिकीने बेण्या-बियाण्यांत वांच्छित गुणगुणांची बेरीज करता येते. तसेच अवांच्छित गुणदोष वजाही करता येतात.

By

Published : Jun 10, 2019, 7:44 PM IST

तंत्रज्ञान स्वातंत्र्यासाठी शेतकऱयांचा अकोल्यात एल्गार मेळावा.

अकोला - भारतातील पर्यावरण अतिरेक्यांच्या दुराग्रहामुळे जैव तंत्रज्ञानाचा मार्ग अवरुद्ध झाला आहे. जैव तंत्रज्ञानाचे प्रयोग पुन्हा सुरू व्हावेत, या शेतकऱयांच्या आग्रहाला पाठींबा देत शेतकरी संघटनेच्या वतीने एचटीबीटी कापूस व वांगे लागवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम सोमवारी रोजी अकोट तालुक्यातील आकोली जहांगीर येथील शेतात घेण्यात आला. यावेळी परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते ललित बहाळे यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम झाला.

तंत्रज्ञान स्वातंत्र्यासाठी शेतकऱयांचा अकोल्यात एल्गार मेळावा.

या कार्यक्रमाला माजी आमदार वामनराव चटप, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट, संघटनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख धनंजय मिश्रा, विदर्भ युवा आघाडी प्रमुख डॉ. निलेश पाटील, सोशल मीडिया प्रमुख विलास ताथोड, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अविनाश नाकट, तंत्रज्ञान जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकार उपस्थित होते. जैव तंत्रज्ञानाने (genetic engineering) उत्पादित जैविकांविषयी मोठा वाद सुरू आहे. या वादाचा फटका फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसत आहे.

शेती व्यवसायात बेण्या-बियाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेती परवडू नये या धोरणासह सिलिंगच्या कायद्यामुळे बहुतांश शेतकरी अल्पभूधारक झालेले आहेत. या 2- 4 एकरांत उदरनिर्वाह शक्य करायचा प्रयत्न करायचा असेल तर शेतीला जागतिक पातळीवरील अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे. त्याशिवाय जागतिक पातळीवरील स्पर्धेला तोंड देणे शक्य होणार नाही, असे सांगून ललित बहाळे म्हणाले, जैवतांत्रिकीने बेण्या-बियाण्यांत वांच्छित गुणगुणांची बेरीज करता येते. तसेच अवांच्छित गुणदोष वजाही करता येतात. भारतातील पर्यावरण अतिरेक्यांच्या दुराग्रहामुळे जैव तंत्रज्ञानाचा मार्ग अवरुद्ध झाला आहे. वारंवार विनंत्या करूनही सरकारने या मार्गातील अडथळे दूर केले नाहीत. जैव तंत्रज्ञानाचे प्रयोग पुन्हा सुरू व्हावे या हेतुने एचटीबीटी (तणनाशक सहनशील कापूस बियाणे) तसेच बीटी वांगे पेरणी व लागवणीचा कार्यक्रम शेतकरी संघटनेने हाती घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमात या तंत्रज्ञानामुळे शेतकऱयांच्या उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न वाढीची प्रचंड मोठी संधी निर्माण होऊन शेतकऱयांच्या आर्थिक अडचणी कमी होऊ शकतात. मात्र, पर्यावरणवाद्यांच्या अतिरेकाला बळी पडून सरकार शेतकऱयांची अडवणूक करीत असल्याचा आरोप यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात मान्यवरांनी केला. यावेळी शेकडो शेतकरी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details