महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हा तत्काळ प्रतिसाद केंद्र कार्यान्वित; केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते उद्घाटन

जिल्हा तत्काळ प्रतिसाद केंद्रात 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांच्या विविध आजारांचे निदान, उपचार विविध तज्ज्ञांमार्फत करण्याची सुविधा आहे. या केंद्राचे उद्घाटन केंद्रीय मानव संसाधन, दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते आज शनिवारी करण्यात आले.

केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे

By

Published : Aug 24, 2019, 11:17 PM IST

अकोला - जिल्हा तत्काळ प्रतिसाद केंद्रात 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांचे विविध आजारांचे निदान उपचार विविध तज्ज्ञांमार्फत करण्याची सुविधा जिल्हा स्त्री रुग्णालयात करण्यात आली आहे. या केंद्राचे उदघाटन केंद्रीय मानव संसाधन, दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

जिल्हा तत्काळ प्रतिसाद केंद्राचे केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते उद्घाटन

बालवयात झालेल्या कोणत्याही आजाराचे निराकरण वेळेत झाल्यास आजार बरा होण्यास वेळ लागत नाही. जिल्हा तत्काळ प्रतिसाद केंद्रात 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांचे विविध आजारांचे निदान, उपचार विविध तज्ज्ञांमार्फत करण्याची सुविधा आहे. त्यामुळे लहान वयातच आजाराचे निदान होऊन लवकर उपचार करणे शक्य होईल आणि बालकांमधील विविध आजार व विकृतींबाबत या केंद्रावर मार्गदर्शन व उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन धोत्रे यांनी केले. या जिल्हा तत्काळ प्रतिसाद केंद्रात लहान मुलांसाठी प्ले एरिया, स्पीच थेरेपी रूम, सेन्सोरी इंटेग्रेशन रूम, व्हिजन असेसमेंट रूम, हिअरींग असेसमेंट रूम, डेंन्टल ओपीडी आदी कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. अशी माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल यांनी दिली. सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार मेघना बगडीया यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला महापौर विजय अग्रवाल, आमदार गोपीकिसन बाजोरिया, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षीका डॉ. आरती कुलवाल, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, डॉ. पवनिकर, विस्तार माध्यम अधिकारी प्रकाश गवली तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details