महाराष्ट्र

maharashtra

अकोल्यातील ‘नो मास्क, नो सवारी’ मोहिमेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून कौतुक

नागरिकांनी मास्क वापरणे अनिवार्य आहे. परंतु, त्याचे काटेकोर पालन होत नाही. परिणामी, कोरोना संसर्ग प्रतिबंध करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे, प्रत्येक नागरिकांनी मास्क वापरावे यासाठी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी 'नो मास्क नो सवारी', 'नो मास्क नो बुक', 'नो मास्क नो खरेदी' अशा मोहीम राबवल्या आहे.

By

Published : Sep 26, 2020, 9:26 PM IST

Published : Sep 26, 2020, 9:26 PM IST

ऑटोचालक नो मास्क नो सवारी मोहीम
ऑटोचालक नो मास्क नो सवारी मोहीम

अकोला- शहर वाहतूक शाखेकडून 'नो मास्क, नो सवारी' ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी मास्क वापरावा हाच या मोहिमेचा उद्देश आहे. या मोहिमेचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत केले.

आढावा बैठकीला पालकमंत्री बच्चू कडू, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, आदींची उपस्थिती होती. नागरिकांनी मास्क वापरणे अनिवार्य आहे. परंतु, त्याचे काटेकोर पालन होत नाही. परिणामी, कोरोना संसर्ग प्रतिबंध करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे, प्रत्येक नागरिकांनी मास्क वापरावे यासाठी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी 'नो मास्क, नो सवारी', 'नो मास्क, नो बुक', 'नो मास्क, नो खरेदी' अशा मोहीम राबवल्या आहे. अकोल्यात दोन हजार ऑटोचालक आहेत. परंतु, ऑटोचालक मास्क वापरत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी 'नो मास्क, नो सवारी' या मोहिमेच्या माध्यमातून ऑटोचालकांना मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. तसेच, मास्क घालणाऱ्या प्रवाशालाच ऑटोमध्ये बसवा, असे आवाहन केले आहे. असे न केल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा शेळके यांनी ऑटोचालकांना दिला आहे. दरम्यान, ही मोहीम राज्यभर राबवण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक शेळके यांनी सांगितले.

हेही वाचा-अकोला : व्यापाऱ्यांचा बंदला संमिश्र प्रतिसाद; रस्त्यांवर नागरिकांची गर्दी

ABOUT THE AUTHOR

...view details