महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात कारमध्ये गुदमरून चिमुकल्याचा मृत्यू, २ वर्षांपासून होती बंद अवस्थेत

आजी आणि मावशीसोबत प्लास्टीक कचरा वेचण्यासाठी आलेल्या बालकाचा कारमध्ये गुदमरून मृत्यू झाला आहे.

मृत तानेश विष्णू बल्लाळ,

By

Published : Jun 5, 2019, 12:25 PM IST

Updated : Jun 5, 2019, 12:56 PM IST

अकोला- एका बालकाचा गाडीत गुदमरून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील देवरीफाट्याजवळच्या आलेवाडीत ही घटना घडली. तानेश विष्णू बल्लाळ, असे मृत मुलाचे नाव आहे.

तानेश आपल्या आजी आणि मावशीसोबत प्लास्टीक कचरा वेचण्यासाठी आलेवाडीमध्ये आला होता. आलेवाडीमध्ये काटेरी झुडपात उभ्या असलेल्या कारमध्ये तो बसला. मात्र, कारचे दरवाजे अचानक बंद झाले. त्यामुळे बालकाचा गुदमरून मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुपारी उन असल्याने तो सावली मिळावी यासाठी गाडीत बसला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

गाडीबद्दल चौकशी केली असता गेल्या २ वर्षांपासून गाडी बंद अवस्थेत उभी असल्याचे गाडीचे मालक नागेश कराळे यांनी सांगितले. यासंदर्भातील पुढील तपास दहीहंडा पोलीस करीत आहेत.

Last Updated : Jun 5, 2019, 12:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details