अकोला - युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने विविध मागण्यांसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात नऊ संघटना सहभागी झाल्या होत्या. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या. या मोर्चात बँक कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत शासनाच्या धोरणाविरोधात रोष व्यक्त केला.
20 टक्के पगारवाढ, मूलभूत वेतनामध्ये (बेसिक पे) विशेष भत्ता विलीनीकरण, निवृत्ती वेतनाचे अद्ययावतीकरण, 27 महिन्यांपासून रखडलेली नवी वेतनश्रेणी, थकीत कर्जाच्या तरतुदीमुळे शासनाने बँकांवर जबरदस्तीने लादलेली दूरवस्था, तसेच भरती बंद केल्यामुळे कर्मचाऱ्यांवर ओढवलेला ताण आदी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.