महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कुर्‍हाडीने जीवघेणा हल्ला करून जिवंत पेटवले; वाचा सविस्तर...

शेतशिवारात मजुरी करत असताना दोन मजुरांमध्ये वाद झाला. याच वादातून एका मजुराने दुसऱ्या मजुरावर कुऱ्हाडीने जिवघेणा हल्ला केला आणि नंतर गावठी दारू टाकून पेटवून दिले.

अकोला
अकोला

By

Published : Sep 14, 2020, 2:15 AM IST

अकोला - सुकळी शेत शिवारात किरकोळ कारणावरून आधी जीवघेणा हल्ला करुन नंतर गावठी दारूने पेटवून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस ठाण्यांतर्गत रविवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. राजाराम तुकाराम हिवराळे असे मृतकाचे नाव आहे. तर विकास बाबूसिंग राठोड असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी विकास राठोड व मृतक राजाराम हिवराळे हे दोघे जण एका शेत मजुरी करत होते. रविवारी सायंकाळी किरकोळ कारणावरून आरोपी विकास राठोड याने राजाराम हिवराळे यांच्यावर कुर्‍हाडीने जीवघेणा हल्ला केला. नंतर दारूने पेटवून दिल्यावर गंभीर अवस्थेमध्ये हिवराळे यांना जवळील नाल्याच्या काठावर टाकून दिले. या घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलिस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार सचिन यादव यांच्या मार्गदर्शनात आदिनाथ गाठेकर, पद्माकर पातोंड, किरण गवई, रावसाहेब बुधवंत, सुधाकर करवते, खत्री, संतोष जाधव, यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून गंभीर झालेल्या राजाराम हिवराळे, यांना अकोला येथे उपचारासाठी हलविले. परंतु, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपीस अटक केली आहे.

हेही वाचा -कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी काय काळजी घ्यावी ?

ABOUT THE AUTHOR

...view details