अकोला - 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे आदेश देणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज थेट बाजारात जाऊन मास्क न वापरणाऱ्या व्यापारी, ग्राहक व नागरिकांवर कारवाई केली. या धडक कारवाईमध्ये महसूल विभाग, पोलीस प्रशासन, मनपा आणि आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अकोल्यात मास्क न वापरणार्यांवर कारवाईसाठी जिल्हाधिकारी उतरले रस्त्यावर
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी न्यू क्लॉथ मार्केट परिसरात धडक दिली. मास्क न वापरणाऱ्या सामान्य नागरिक, ग्राहक, व्यापारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई केली. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा महापालिकेसमोर नेला. गांधी चौकामध्ये त्यांनी ऑटोवर 'नो मास, नो सवारी'चे फलक चिटकले.
या कारवाईमुळे मार्केटमधील सर्वच व्यापारी व कामगारांनी तोंडावर मास्क बांधले. त्यामुळे याठिकाणी कारवाईसाठी फारसा वाव त्याना मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा महापालिकेसमोर नेला. गांधी चौकामध्ये त्यांनी ऑटोवर 'नो मास, नो सवारी'चे फलक चिटकले. या धडक मोहिमेमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, मनपा आयुक्त संजय कापडणीस, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम, तहसीलदार विजय लोखंडे, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. फारुक शेख, पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके आदी उपस्थित होते. या धडक कारवाईमुळे एकच खळबळ उडाली होती.