शिर्डी- राहूरी तालुक्यातील आंबी येथील 20 वर्षीय फारुख मन्सूर इनामदार या युवकाने नदीच्या काठावर असलेल्या झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली. पब्जी गेमच्या नादात या युवकाने आत्महत्या केल्याची चर्चा सध्या सुरू आहे. रमजान ईदच्या पवित्र दिवशी आत्महत्या केल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.
रमाजन ईदच्या दिवशी पब्जी गेम बेतला जीवावर, तरुणाची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या
राहूरी तालुक्यातील आंबी येथील 20 वर्षीय फारुख मन्सूर इनामदार या युवकाने नदीच्या काठावर असलेल्या झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली
मृत फारुख मन्सूर इनामदार याने झाडाला गळफास घेतलेली घटना प्रथम शाहरुख मन्सूर इनामदार या त्याच्या भावाने पाहिली. त्यानंतर त्याने आंबी येथील पोलीस पाटील बाळासाहेब लोंढे याना यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर त्यांनी देवळाली पोलीस स्टेशनला याची माहिती दिली. लगेच देवळाली येथील पोलीस पाठक व शिरसाठ यांनी घटनास्थळी धाव घेत, या घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास करत आहेत.
रमजान ईदच्या दिवशीच या तरुणाने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. राहुरी पोलिसांनी मृत फारुख मन्सूर इनामदार याचा मृतदेह राहुरी ग्रामीण रुग्नालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, आत्महत्या का केली? या तपास पोलीस करत आहेत.