महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये शेततळ्यात बुडून इंजिनिअर तरुणाचा मृत्यू

नितीन दिसत नसल्याने त्याच्या पत्नीने आरडाओरड केला. त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी शेततळ्यावर धाव घेतली. त्यानंतर नितीनला पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

मृत नितीन एकनाथ नवले

By

Published : May 4, 2019, 6:04 PM IST

अहमदनगर -संगमनेर तालुक्यातील मालदाड येथे इंजिनिअर तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. शेततळ्यातील पाणी काढण्यासाठी पाईप टाकताना पाय घसरल्याने आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नितीन एकनाथ नवले (वय ३३) असे मृताचे नाव आहे.

मालदाड गावात गोसावी मळा परिसरात नितीन नवले आपल्या कुटुंबासमवेत राहत होता. सकाळी शेततळ्यातून पाणी काढण्यासाठी पाईप टाकत असताना त्याचा पाय घसरुन तो पाण्यात पडला. बराच वेळ झाला तरी पती घरी आला नाही. त्यामुळे त्याच्या पत्नीने शेतात जाऊन बघितले असता नितीनची चप्पल शेततळ्याबाहेर दिसली. मात्र, नितीन दिसत नसल्याने त्याच्या पत्नीने आरडाओरड केला. त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी शेततळ्यावर धाव घेतली. त्यानंतर नितीनला पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

नितीन पश्‍चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ, बहीण असा परिवार आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details