महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्ह्यात आणखी दोन कोरोनाबाधितांची नोंद, रुग्णांची संख्या 68 वर

जिल्ह्यात बुधवारी आणखी दोन जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय नगर शहरातील सुभेदार गल्ली येथील कोरोनाबाधित वृद्ध महिलेचा १० दिवसा नंतरचा अहवालही पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित व्यक्तीची संख्या आता ६८ झाली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

By

Published : May 21, 2020, 10:50 AM IST

जिल्हात आणखी दोन कोरोनाबाधितांची नोंद
जिल्हात आणखी दोन कोरोनाबाधितांची नोंद

अहमदनगर -जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या ४८ पैकी ४५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर, संगमनेर शहरातील रहमत नगर येथील बाधित व्यक्तीची पत्नी आणि नगर शहरातील जुना मंगळवार बाजार येथील एक रिक्षाचालक यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय नगर शहरातील सुभेदार गल्ली येथील कोरोनाबाधित वृद्ध महिलेचा १० दिवसा नंतरचा अहवालही पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित व्यक्तीची संख्या आता ६८ झाली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

बुधवारी रात्री जिल्हा रुग्णालयाकडे ४८ अहवाल प्राप्त झाले. संगमनेर येथील एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आला होता. त्याच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात, या व्यक्तीची पत्नी बाधित झाल्याचे आढळून आले आहे. याशिवाय, नगर शहरातील एका रिक्षाचालकाला कोरोनाची लागण झाली आहे. सर्दी आणि खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्याला दोन दिवसांपूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. हा व्यक्तीही बाधित आढळून आला आहे. काही दिवसांपूर्वी सुभेदार गल्ली येथील वृद्ध महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. या महिलेचा १० दिवसांनंतर बुधवारी आलेला अहवालही पॉझिटिव आला आहे. तर, उर्वरित सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details