महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नगर-औरंगाबाद महामार्गावर ट्रकरच्या धडकेनंतर बस पेटली, २३ प्रवासी जखमी

नगरवरुन औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने बसला समोरून धडक दिली. या अपघातात २३ प्रवासी जखमी झाले आहेत.

एसटी बस

By

Published : Jul 9, 2019, 10:05 AM IST

अहमदनगर- नगर-औरंगाबाद रोडवरील शासकीय विश्रामगृहसमोर एसटी बस आणि ट्रकचा अपघात झाला. मंगळवारी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात २३ प्रवासी जखमी झाले आहेत. बस चालक आणि वाहकही या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त एसटी बस औरंगाबादवरून पुण्याला जात होती.

ट्रकच्या धडकेनेनंतर एसटी बस पेटली

अपघातानंतर बसने पेट घेतला. मात्र, तोपर्यंत सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. या आगीत बस जळून खाक झाली. अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे एसटी महामंडळाच्या नगर विभागीय कार्यालयाकडून सांगण्यात आले.

नगरवरुन औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने बसला समोरून धडक दिली. ट्रकची धडक एवढी जोराची होती की परिसरात मोठा आवाज झाला. बसमधील प्रवासी अपघाताच्या वेळी झोपेत होते. त्यामुळे नेमके काय झाले हे प्रवाशांना समजले नाही आणि एकच आरडाओरडा झाला. बस चालकाच्या शेजारील भागात असलेले प्रवासी सर्वाधिक जखमी झाले आहेत. यात एका लहान बाळाचादेखील समावेश आहे.

बसमधील जखमींना नगरमधील कळमकर हॉस्पिटल, साई एशियन आणि अपेक्स रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आहे. जखमींपैकी ७ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. यात एसटी चालक आणि वाहकांचा देखील समावेश आहे. जखमींमध्ये औरंगाबाद सिल्लोड नगर आणि पुण्यातील प्रवाशांचा समावेश आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details