अहमदनदर-येथील शेवगाव बसस्थानकात शेवगाव-मुरशतपूर-धावनवाडी बस वेळेवर सुटत नाही. याचा विद्यार्थ्यांना नेहमीच त्रास हातो. त्यामुळे काल (शुक्रवारी) सायंकाळी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आहे. यावेळी काही सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते. मात्र, पोलिसांच्या मदतीने हे आंदोलन मागे घेण्यात आले.
...म्हणून शेवगाव बस स्थानकात विद्यार्थ्यांनी केला रास्ता रोको
शुक्रवारी सायंकाळी नेहमी 5 वाजून 30 मिनीटाने सुटणारी शेवगाव-मूर्शतपूर-धावनवाडी गाडी सात वाजले तरी आली नाही. त्यामुळे शाळकरी मुले गोंधळून गेली. काही मुले रडू लागली. त्यांनी झालेली कैफियत कॉ. संजय नांगरे आणि सामाजिक कार्यकर्ते अविनाश देशमुख यांना सांगितली.
हेही वाचा-नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयक सर्व राज्यांना लागू करावेच लागणार; 'ही' आहे घटनात्मक तरतूद
शुक्रवारी सायंकाळी नेहमी 5 वाजून 30 मिनिटाने सुटणारी शेवगाव-मूर्शतपूर-धावनवाडी गाडी सात वाजले तरी आली नाही. त्यामुळे शाळकरी मुले गोंधळून गेली. काही मुले रडू लागली. त्यांनी झालेली कैफियत कॉ. संजय नांगरे आणि सामाजिक कार्यकर्ते अविनाश देशमुख यांना सांगितली. याची दखल घेऊन संबंधीत विद्यार्थ्यांनी आणि इतर बस प्रवाशांनी रास्ता रोको केला. यावेळी घोषणाही देण्यात आल्या. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करून डेपो मॅनेजर आणि इतर अधिकाऱ्यांशी संपर्क करून बस मार्गस्थ करून दिली. यावेळी उपनगराध्यक्ष वजीर पठाण, वाहबभाई शेख, पत्रकार रवी उगलमुगले, राजू दुसंग, प्रवासी, नागरिक उपस्थित होते.