महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shanishingnapur : कोरोनामुळे शनिशिंगणापूर मंदिर बंद; परिसरातील कुटुंबांवर उपासमारीची वेळ

शनिशिंगणापूर येथील शनिदेवाचे मंदिर कोरोनामुळे दीड वर्षापासून बंद आहे. त्यामुळे देवस्थान ट्रस्टला येणारे सर्व उत्पन्न व देणगी बंद आहे. नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि शनिशिंगणापूर हे दोन प्रमुख देवस्थानं सलग दीड वर्ष बंद राहिल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Shanishingnapur
शनिशिंगणापूर मंदिर

By

Published : Sep 28, 2021, 3:38 PM IST

Updated : Sep 28, 2021, 6:56 PM IST

अहमदनगर - जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथील शनिदेवाचे मंदिर कोरोनामुळे दीड वर्षापासून बंद आहे. त्यामुळे देवस्थान ट्रस्टला येणारे सर्व उत्पन्न व देणगी बंद आहे. मंदिर व्यवस्थेवर अवलंबून असणारे हजारो व्यावसायिक, लहान उद्योजक व वाहतूक यंत्रणेतील युवकांची रोजीरोटी बंद झाली आहे. मंदिर बंदमुळे गाव व परिसराच्या अर्थकारणावर मोठा परिणाम झाला आहे.

ई टीव्ही भारतने घेतलेला आढावा

हेही वाचा -अबू धाबीत साकारणार भव्य राम मंदिर, 888 कोटींचा येणार खर्च

  • शनिशिंगणापूर मंदिर प्रशासनाला कोट्यवधीचा तोटा -

कोरोना संसर्ग वाढत असल्यामुळे जगभरातील धार्मिक स्थळं व पर्यटन केंद्र बंद झाले होते. जिल्ह्यातील शिर्डी आणि शनिशिंगणापूर हे दोन प्रमुख देवस्थानं सलग दीड वर्ष बंद राहिल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. शनैश्वर देवस्थानला दीड वर्षात अंदाजे पंचवीस ते तीस कोटीचे नुकसान झाले आहे. येथील बर्फी प्रसाद भाविकांसाठी खुपच प्रिय आहे. बर्फीच्या माध्यमातून तीन कोटी रुपये, भोजनालय दीड कोटी, गाळे व इतर टेंडरमध्ये सहा कोटी तर दानपात्र व देणगी कक्षामध्ये भाविकच नसल्याने तेरा कोटींचे नुकसान झाले आहे. पैशाची आवक बंद असली तरी देवस्थानाला वर्षाला एक कोटीचे लाईट बील भरावे लागते. रुग्णवाहिका व इतर वाहन खर्च, इन्शुरन्स आदीला वर्षाला पन्नास लाख रुपये खर्च आहे.

  • परिसरातील अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ -

शिर्डी-शिंगणापूर मार्गावर तीनशेहून अधिक वाहने प्रवासी वाहतूक करतात. या यंत्रणेवर पाच हजाराहून अधिकांचे पोटपाणी चालते. रस्त्यावर असलेले अनेक हॉटेल, नाश्ता, चहा टपरी, उसाच्या रसवंतीसह अनेक व्यवसाय फक्त शनिभक्तांच्या जीवावर चालत होते. सध्या यातील 90 टक्के दुकानं ओस पडली आहेत. पूजा साहित्य, रुईचे हार, काळी बाहुली, प्रसाद पाकीट, नवधान्य, यंत्र आदीसाठी काम करणारे पाचशेहून अधिक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. परिसरात अनेक शेतकरी कुटुंबांनी फुलांची शेती केली असून, मंदिर बंदचा यावरही मोठा परिणाम झाला आहे.

  • राज्यातील मंदिरं 7 ऑक्टोबरपासून होणार सुरू -

शासनाने दैनंदिन बाबींना अनलॉक म्हणून मान्यता दिली आहे. या ठिकाणीसुद्धा गर्दी गोळा होत असते, परंतु त्याठिकाणी शासनाने पूर्ण मान्यता दिलेली आहे. मंदिर परिसरातील दुकाने बंद असल्याने व्यापारी अडचणीत येऊन त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. मंदिर परिसरातील प्रसाद, खेळणी, फोटो फ्रेम, स्टेशनरी, हॉटेल अशी मिळून सुमारे दीडशे दुकाने बंद आहेत. काही तरुणांनी व्यवसायासाठी शिर्डी शिंगणापूर येथील भाविकांना ने-आण करण्यासाठी चारचाकी वाहने कर्ज काढून घेतले आहेत. त्या गाड्यांचे हप्ते वेळेवर न गेल्यामुळे फायनान्स कंपन्यांचा तगादा चालू झाला आहे. यातील अनेक वाहने ओढून नेण्यात आली आहेत.

अशा परिस्थितीत जनभावनेचा विचार करून महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे सुरू करण्याची मागणी येथील व्यावसायिक व गाळेधारक करत आहेत. शनिशिंगणापूर गाव बंदचा परिणाम इतर अनेक गावांवर झाला आहे. हजारो कुटुंब सध्या मंदिर उघडण्याच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, आता राज्य सरकारने राज्यातील सर्व मंदिर 7 ऑक्टोबरपासून सुरू करण्याची घोषणा केली असल्याने येथील व्यावसायिकांबरोबर भाविकांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा -कोल्हापूरच्या अंबाबाईचे मंदिर दर्शनासाठी होणार खुले; मार्गदर्शक सूचना होणार जारी

Last Updated : Sep 28, 2021, 6:56 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details