महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...त्यांना कळून चुकलंय म्हणून मोदींसह अमित शाह महाराष्ट्रभर सभा घेतायेत

अहमदनगरमधील अकोले येथील प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह यांच्यावर कडाडून टीका केली.

अकोलेतील जाहीर सभेत शरद पवारांची अनेक भाजप नेत्यांवर टीका

By

Published : Oct 13, 2019, 4:03 PM IST

अहमदनगर - भाजप नेत्यांना आता कळून चुकले आहे, की महाराष्ट्रातील जनता त्यांना साथ देणार नाही. म्हणून ते राज्यभर सभा घेत असल्याची टीका शरद पवारांनी केली. अकोले येथील प्रचारसभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह महाराष्ट्रात काय प्रवचन करण्यासाठी येतायेत ? असा टोलाही पवारांनी यावेळी भाजप नेत्यांना लगावला. मधुकर पिचड राष्ट्रवादी काँग्रेस सोडुन गेल्यानंतर पवार पहिल्यांदा अकोल्यात आले होते. पिचड यांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली.

अकोलेतील जाहीर सभेत शरद पवारांची अनेक भाजप नेत्यांवर टीका


अकोले येथील प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. अकोले तालुक्यातील आदिवासींचा विकास करण्यासाठी मी नेहमी पिचडांना साथ दिली. मात्र, ते मला सोडुन विकास करण्यासाठी भाजपात गेल्याचे सांगतात. मग, ४० वर्षे गवत उपटत होतात काय? असा सवाल पवार यांनी केला.

हेही वाचा - खर्चात त्रुटी, निवडणूक अधिकाऱ्यांची पाचपुते-शेलारांना बजावली नोटीस
पिचडांनी विकास केला तो बाजुच्या भागाचा, आदिवासींसाठी केलेल्या कायद्याचा त्यांनी गैरवापर केला. ते अंगलट येईल म्हणुन त्यांनी पक्ष बदल्याची टीकाही जिल्ह्यातल्या अकोले येथे पक्षाचे उमेदवार किरण लहामटे यांच्यासाठी घेतलेल्यी प्रचारसभेत शरद पवारांनी केली.

हेही वाचा - 'सर्वसामान्य नागपूरकरांनी केलेल्या अवस्थेमुळे पवारांना जळीस्थळी नागपूरकर गुंडच दिसतात'
आमचे पैलवान तेल लावुन मैदानात लढायला तयार आहेत. मात्र, समोर कोणी पैलवानच नाही असा उल्लेख मुख्यमंत्री भाषणात करतात. मी कुस्ती संघाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे कुस्ती कोणाशी आणि कशी खेळतात हे मला चांगले ठाऊक आहे. अहो मुख्यमंत्री साहेब कुस्ती पैलवानांच्यात होते अशी टीकाही पवारांनी केली. समोर पैलवान नाही म्हणता, तर मग पंतप्रधान आणि गृहमंत्री इकडे काय भंडारदरा धरण पहायला येतात का? असा सवालही यावेळी त्यांनी केला.
हेही वाचा - विधानसभा निवडणूक 2019 : अहमदनगरमधील कोपरगाव विधानसभेत चौरंगी लढत

ABOUT THE AUTHOR

...view details