शिर्डी -अकोले तालुक्यातील मुळा आणि भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रांत आषाढ सरी कोसळत आहेत. त्यामुळे परिसरातील धबधबे जोरात कोसळत आहेत. उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेले भंडारदरा धरणही 30 टक्के भरले आहे. मुळा नदिला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने कोतुळ येथील महादेव मंदिरात पाणी शिरले आहे. अकोले तालुक्यातील राजूर जवळील गांजवणे घाटात दरड कोसळली. यामुळे बस सकाळ पासून घाटात आडकल्याने विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना पायी प्रवास करावा लागत आहे.
आठवडाभरापासून मुळा, भंडारदरा पाणलोट क्षेत्रांत कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरुच आहे. काल पासुन पाणलोट क्षेत्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक वेगाने सुरू आहे. मुळा पाणलोट क्षेत्रातही पावसाचे सातत्य राहिल्याने मुळा नदीचा प्रवाह टिकून आहे. कोतूळ येथून 2 हजार 984 क्युसेकने मुळा धरणाकडे पाण्याची आवक सुरू आहे. मुळा पाणलोट क्षेत्रातील अंबित, बलठण, शिरपुंजे, कोथळा, पिंपळगाव खांड, ही पाचही धरणे ओव्हर फ्लो झाली आहेत. त्यामुळे नदीच्या पाण्यात वाढ होत आहे. कोतुळ येथील नदी काठी असलेल्या महादेव मंदीरात पाणी घुसले आहे. 26 टीएमसीच्या मुळा धरणात या वर्षीच्या पावसाळ्यात 1 टीएमसी नवीन पाणीसाठा जमा झाल आहे.
24 तासांत जिल्ह्यात झालेला पाऊस (मि. मी.)
भंडारदारा - 140 मी.मी