अहमदनगर - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध संपूर्ण देशात आंदोलने होत आहेत. याचेच पडसाद जिल्ह्यातील जामखेडमध्ये पहायला मिळाले. जामखेड येथे मुस्लीम बांधव, जमियत-ए-ऊलेमा हिंद, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि समविचारी संघटनांनी तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी धरणे आंदोलनही करण्यत आले. आंदोलक दुपारी तीनच्या सुमारास येथील खर्डा चौकात जमा झाले. यावेळी विविध घोषणाही देण्यात आल्या.
जमियत-ए-ऊलेमाचे जिल्हाध्यक्ष मौलाना इर्शाद अल कासमी यांनी केंद्र सरकारवर या बिलाच्या संदर्भात जोरदार टिका केली. ते म्हणाले, देशातील भाजप सरकार हे लोकशाही व संविधान विरोधी सरकार आहे. या सरकारने आणलेले नागरिकता संशोधन विधेयक (NRC व CAB) हे घटनाबाह्य आहे. तसेच ते संयुक्त राष्ट्र संघ आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहे.
हेही वाचा -"भारताचे नागरिकत्व सिद्ध करण्यात 'प्रॉब्लेम' काय ?"
सदर कायद्यामुळे देशात दुफळी निर्माण होऊन देशाच्या समता बंधुता, न्यायाला बाधा निर्माण होणार आहे. त्यामुळेच देशाची एकता व अखंडता टिकविण्यासाठी या विधेयकाला कडाडून विरोध करणे अत्यंत आवश्यक आहे. मागील ७३ वर्षात कॉलेजचे विद्यार्थी रस्त्यावर आले नव्हते, यावेळची युवा पिढी हुशार आहे. ते या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर आले आहे. मोदी, शाह हे कोणत्या देशभक्तीबाबत बोलत आहे. त्यांनी आसामच्या चार जिल्ह्यात ४० लाख लोकांना एनआरसी मध्ये आणण्यासाठी निर्णय घेतला. त्यातील २१ लाख लोकांपैकी १७ लाख हिंदू तर ४ लाख मुस्लिम आहेत. त्यांना मुलभूत सुविधा दिल्या जात नाहीत त्यांच्या मोठ्या प्रमाणावर हालअपेष्टा चालू आहे. तेथील इंटरनेट सुविधा, मोबाईल सेवा बंद आहेत. मीडिया तेथे जाऊ शकत नाही. आता ते आपल्याच नागरिकत्वाबाबत त्यांनी शंका घेत आहेत.
हेही वाचा -कांदे भाववाढीनंतर महागणार फोडणीचाही 'तडका'
आम्ही देश सोडून जाणार नाही आम्ही येथील वतनदार आहे. या गोष्टीवर ध्यान देण्यापेक्षा देशाचा जीडीपी दर बांगलादेश व पाकिस्तान पेक्षा जास्त घसरला आहे. देशातील १३० कोटी जनतेपैकी २२ कोटी जनता अद्याप उपाशी आहेत. दररोज 4 मुलीवर लैंगिक अत्याचार होत आहेत, १२ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यावर उपाययोजना करण्यापेक्षा इतरत्र लक्ष वेधले जात आहे. तिहेरी तलाक, ३७० कलम लागू केले ते आम्ही स्विकारले याचा फायदा घेऊन ते आता नागरिकत्व कायदा लागू करून केवळ मुस्लीम समाज नव्हे तर इतर सर्व समाजाची देशप्रेमाबाबत शंका घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला.