अहमदनगर- शहरातील नवीन टिळक रोडवर असलेल्या एका हुक्का पार्लरवर पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकला. यात वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले. शहर पोलिसांनी ही कारवाई केली.
अवैध हुक्का पार्लरवर छापा; अहमदनगर पोलिसांची कारवाई
शहरात महाविद्यालयीन तरुण-तरुणींना आकर्षित करण्यासाठी नवीन टिळकरोडवर विनापरवाना हुक्का पार्लर सुरू असल्याची गुप्त माहिती शहर पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती.
हेही वाचा-आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मद्यपींनी दिला त्रास; सभागृहात केली तक्रार
शहरात महाविद्यालयीन तरूण-तरूणींना आकर्षित करण्यासाठी नवीन टिळक रोडवर विनापरवाना हुक्का पार्लर सुरू असल्याची गुप्त माहिती शहर पोलीस उपाअधिक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे उपअधिक्षक मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ, सहायक पोलीस निरीक्षक रणदिवे यांच्या पथकांनी पार्लवर छापा टाकला. यावेळी हुक्काचा चालक-मालक दिनेश खरपुडेला पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम 2003 नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.