अहमदनगर-जिल्ह्यातील नगर-पाथर्डी रोड वरील करंजी घाटात डिझेल घेऊन जाणा टँकर पलटी झाला. डिझेल टँकर मुंबईहून परभणी कडे जात असताना करंजी घाटातील एका वळणावर पलटी झाला. यामुळे टॅंकरमधील डिझेल रस्त्यावरून पाण्यासारखे वाहू लागले. ही परिस्थिती लोकांच्या लक्षात येताच परिसरातील लोकांसोबत येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांनी मिळेल त्या वस्तू मध्ये डिझेल भरून लूटमार करण्याचा प्रयत्न केला.
करंजी घाटात पलटी झालेल्या टँकरमधील डिझेलवर स्थानिकांचा जीव धोक्यात घालून डल्ला
करंजी घाटात पलटी झालेल्या रिलायन्स कंपनीच्या टँकर मधील डिझेलवर स्थानिकानी जीव धोक्यात रस्त्यावरुन वाहणारे डिझेल भरुन नेले. या टँकरमध्ये चोवीस हजार लिटर डिझेल होते.
वास्तविक डिझेल हा ज्वालाग्राही पदार्थ आहे, तरीही जीवाची पर्वा न करता ही लोक रस्त्यावरून वाहणारे डिझेल प्लास्टिक कॅन, बाटली, बादली यात जितके जमेल तसे भरुन घेत होते. यावेळी डिझेलने पेट घेतला नाही अन्यथा या महामार्गावर एक मोठी दुर्घटना घडून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असते.
पाथर्डी पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी लूटमार करणाऱ्या वाटसरुना बाजूला केले. मुंबईहून रिलायन्स कंपनीचा हा डिझेल टँकर परभणी कडे जात असताना राष्ट्रीय महामार्ग कल्याण-त्रिवेंद्रमवर करंजी घाटात हा प्रकार घडला. सुदैवाने टँकर चालक या दुर्घटनेतून बचावला आहे. या टँकर मध्ये चोवीस हजार लिटर डिझेल होते.