अहमदनगर- विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी तालुक्यातील पारनेर येथे उपोषण सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देत अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनीही आंदोलन सुरु केले आहे.
अण्णाच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नागरिकांचे 'सत्याग्रह आंदोलन'
अण्णा हजारेंच्या आंदोलनाला पाठिंबा देत अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनीही आंदोलन सुरु केले आहे.
संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा या गाव आहे. येथील मारुती मंदिरात राष्ट्रीय किसान महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अरुण कान्हेरे तसेच ग्रामस्थांनी अण्णांच्या आंदोलनाला पाठींबा देत 'सत्याग्रह आंदोलन' सुरू केले आहे.
सरकार जोपर्यंत अण्णांच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत सत्याग्रह आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. या उपोषणात नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, पंचायत समिती सभापती निशा कोकणे, पंचायत समिती सदस्या प्रियांका गडगे, सरपंच अरुणाताई भुजबळ, उपसरपंच सुरेश कान्होरे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब ढोले, राहुल कान्होरे, नितीन काशीद, दत्तात्रय कान्होरे, नंद कुमार कान्होरे, दीपक ढमढेरे, सर्जेराव ढमढेरे, संतोष मुंढे, अविनाश भोर, बाळासाहेब गाडेकर, प्रमोद मुंढे, सुरेश मुंढे, अमोल कहाणे, मिलिंद थोरात आदींसह ग्रामस्थांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.