महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रत्येक गावांमध्ये बियाण्यांच्या बँका व्हाव्या; पद्मश्री राहीबाईंचा खासदारांशी संवाद

पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे म्हणाल्या की, पैशाच्या बँका गल्लोगल्ली भेटतील. परंतु शेतकरी राजासाठी भरवशाचे आणि शाश्वत बियाणे मिळण्यासाठी गावरान बियाणे वाचवण्याची चळवळ मोठी केली पाहिजे.

By

Published : Jan 19, 2021, 9:49 PM IST

Updated : Jan 19, 2021, 9:58 PM IST

पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांचा खासदारांशी ऑनलाईन संवाद
पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांचा खासदारांशी ऑनलाईन संवाद

अहमदनगर-पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी आज संसदेतील खासदारांशी संवाद साधताना महत्त्वपूर्ण गोष्टींना साद घातली. देशामध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणण्यासाठी व शेतकऱ्यांना सुखी आणि आनंदी ठेवावे आहे. त्यासाठी गावोगावी देशी बियाण्यांच्या बँक उभा राहिल्या पाहिजेत, असे मत राहीबाई यांनी व्यक्त केले.

पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे म्हणाल्या की, पैशाच्या बँका गल्लोगल्ली भेटतील. परंतु शेतकरी राजासाठी भरवशाचे आणि शाश्वत बियाणे मिळण्यासाठी गावरान बियाणे वाचवण्याची चळवळ मोठी केली पाहिजे. प्रत्येक राज्यातील प्रत्येक गावांमध्ये देशी बियाण्यांच्या बँक निर्माण व्हाव्यात, अशी भावनिक साद सीड मदर राहीबाई पोपेरे यांनी खासदारांशी बोलताना केली. आपला भारत देश सशक्त करण्यासाठी गावठी आणि पारंपारिक बियाण्यांपासून तयार केलेल्या भाज्यांचे उत्पादन वाढवण्यावर भर दिला पाहिजे. तरच येणारी पिढी सक्षम आणि सुदृढ निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रत्येक गावांमध्ये बियाण्यांच्या बँका व्हाव्या

हेही वाचा-लसीकरणाचे संदेश 48 तास आधी पाठवण्याची गरज - डॉ. मोहन जोशी

मातीशी इमान राखणे हे एकमेव ध्येय-
ग्रामीण भागातील जनतेकडे भरपूर ज्ञान आणि विद्वत्ता उपलब्ध आहे. बायफ संस्थेने जशी मला मदत केली त्याप्रमाणे सरकारने ग्रामीण भागातील टॅलेंट शोधून त्यावर काम केले पाहिजे, असे मत पद्मश्री राहीबाई यांनी व्यक्त केले. त्या पुढे म्हणाल्या की, सामर्थ्यवान भारत निर्माण करण्यासाठी व शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी जीवन समर्पित केलेले आहे. जीवनात गावरान बियाणे संवर्धन व आपल्या मातीशी इमान राखणे हे एकमेव ध्येय ठेवले आहे. लोकसभा सदस्यांना आपापल्या मतदारसंघांमध्ये गरिबातील गरीब लोकांपर्यंत पोहोचण्याचे भावनिक आवाहन केले.

हेही वाचा-राज्यात २ हजार २९४ नवीन कोरोना रुग्णांची वाढ; ५० रुग्णांचा मृत्यू, रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर

निसर्गाकडून मिळाले खरे शिक्षण-
आपला जीवन प्रवास उलगडून सांगताना राहीबाईंनी सांगितले, की बालपण अत्यंत हलाखीत आणि गरिबीत गेले. लहान असतानाच आई आम्हाला सोडून देवाघरी गेली. त्यानंतर वडिलांनीच आमचा सांभाळ केला. बालपणातच कौटुंबिक जबाबदारी येऊन पडल्यानंतर इच्छा असूनही शाळा शिकता आली नाही. परंतु निसर्गाच्या शाळेत भरपूर शिकले. निसर्गानेच मला खरे आणि टिकाऊ शिक्षण दिले.

पुढील आयुष्य हे समाजासाठी आणि गरीब शेतकऱ्यांसाठी-
ग्रामीण आणि आदिवासी भागात अत्यंत खडतर जीवन जगताना अनेक गोष्टींची समाज बालवयातच होत गेली. विवाह लवकरच म्हणजे वयाच्या बाराव्या वर्षी झाला. चार अपत्ये असूनही चारही मुलांची लग्न झालेली आहेत. त्यामुळे कौटुंबिक जबाबदारीतून बऱ्यापैकी बाहेर पडलेली आहे. या पुढील आयुष्य हे समाजासाठी आणि गरीब शेतकऱ्यांसाठी जगायचे आहे. त्यासाठी कटिबद्ध आहे. गावोगावी जाऊन तरुण विद्यार्थ्यांची भेट घेण्यात येते. त्यांना जैवविविधतेची माहिती देत आहोत.

बीज संवर्धन चळवळीला सहकार्य करण्याचे खासदारांना आवाहन-
शाळेत जाऊ शकले नाही, मात्र शाळा माझ्याकडे येते याचा सार्थ अभिमान असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. कोंभाळणेसारख्या आदिवासी आणि छोट्याशा गावातून सुरू केलेली देशी वाण व बीज संवर्धनाची चळवळ देशव्यापी बनत आहे. त्यासाठी सहकार्य करण्याचे राहीबाई यांनी संसदेतील सर्व खासदारांना विनम्र आवाहन केले.

बायफची तज्ज्ञ टीम सरकारला मदत करण्यासाठी तयार

बायफचे विषय तज्ञ यांनी संजय पाटील यांनी बायफ संस्थेतर्फे होत असलेले जैवसंवर्धन विविधता संदर्भातील काम व त्याची व्याप्ती उपस्थितांसमोर मांडली. सरकारकडून प्रत्येक राज्यामध्ये अशा पद्धतीने कार्य सुरू करण्यासाठी बायफची तज्ज्ञ टीम सरकारला मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. व्हर्च्युअल पद्धतीने झालेल्या मार्गदर्शनपर सत्रामध्ये स्थानिक बीज संवर्धन या विषयावर सखोल माहिती देण्यात आली.

Last Updated : Jan 19, 2021, 9:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details