महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडकरींच्या उपस्थित होणार सदाशिव लोखंडेंची सांगता सभा

राहाता शहरातील बाजार तळावर दुपारी ३ वाजता आयोजित केली आहे. या सभेला तालुक्‍यातील महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने उपस्थित राहाणार आहेत. प्रचाराची सांगता केंद्रीय मंत्री गडकरी यांच्‍या उपस्थितीत होत असल्‍याने खासदार लोखंडे यांच्‍या प्रचारात उत्‍साह निर्माण झाला आहे.

By

Published : Apr 26, 2019, 2:41 PM IST

गडकरींच्या उपस्थित होणार सदाशिव लोखंडेंची सांगता सभा

अहमदनगर -शिर्डी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडेंच्‍या प्रचारार्थ २७ एप्रिलला राहाता शहरात सांगता सभा आयोजित करण्‍यात आली आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. सुजय विखे पाटील यांनी याबाबतची माहिती दिली.

राहाता शहरातील बाजार तळावर दुपारी ३ वाजता आयोजित केली आहे. या सभेला तालुक्‍यातील महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने उपस्थित राहाणार आहेत. प्रचाराची सांगता केंद्रीय मंत्री गडकरी यांच्‍या उपस्थितीत होत असल्‍याने खासदार लोखंडे यांच्‍या प्रचारात उत्‍साह निर्माण झाला आहे.

यापूर्वी जलसंपदामंत्री या नात्‍याने गडकरी यांनी निळवंडे धरणाच्‍या कामांसंदर्भात निर्णय घेतले आणि जिरायती भागातील शेतकऱयांना दिलासा दिला. या प्रचार सभेच्‍या निमित्‍ताने निळवंडे धरणाच्‍या संदर्भात कोणते भाष्‍य करतात याची उत्‍सुकता तालुक्‍यातील जिरायती भागातील शेतकऱयांना आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details