महाराष्ट्र

maharashtra

अकोलेतील नवनिर्वाचित आमदाराने बुजवले रस्त्यावरील खड्डे

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अकोले विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे जिकून आले आहेत. नुकतेच आमदार झालेले लहामटे हे अकोले वरूण बारामतीला जात होते. प्रवासा दरम्यान त्यांनी आपली गाडी थांबवून संगमनेर तालुक्यातील बोटा येथील पुणे-नाशिक महामार्गावरील खड्डे बुजविले.

By

Published : Oct 27, 2019, 5:21 PM IST

Published : Oct 27, 2019, 5:21 PM IST

डॉ. किरण लहामटे

अहमदनगर- यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अकोले विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे जिकून आले आहेत. नुकतेच आमदार झालेले लहामटे हे अकोले वरूण बारामतीला जात होते. प्रवासा दरम्यान त्यांनी आपली गाडी थांबवून संगमनेर तालुक्यातील बोटा येथील पुणे-नाशिक महामार्गावरील खड्डे बुजविले.

प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित आमदार डॉ. किरण लहामटे

आमदार लहामटे आज दिवाळी निमित्ताने अकोले वरूण बारामती येथे शरद पवार यांच्या भेटीसाठी जात होते. दरम्यान, संगमनेर तालुक्यातील बोटा येथील पुणे-नाशिक महामार्गवार काही तरुण रसत्यावर पडलेले खड्डे बुजवत असताना त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर किरण लहामटे यांनी आपली गाडी थांबवत युवकांबरोबर रस्त्यावरील काही खड्डे बुजवले. त्याचबरोबर, संगमनेर तालुक्यातील पठार भागातील काही गावाचे रस्त्यांची अवस्था खराब आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणी होत आहे. त्यामुळे सर्वात आधी आपण रस्त्याचा प्रश्न मार्गी लावनार असल्याचे लहामटे यांनी सांगितले.

हेही वाचा-अहमदनगर : पाण्याचा व्हॉल्व फुटल्याने विक्रेते-नागरिकांची दिवाळी बाजारात तारांबळ

ABOUT THE AUTHOR

...view details