अहमदनगर :बीआरएसचे महाराष्ट्रात आपला पक्ष विस्तार करण्याचे काम जोरदार सुरू आहे. अनेक नेते या पक्षात प्रवेश करत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका नेत्याने बीआरएसमध्ये प्रवेश केल्याचे समोर येत आहे. घनश्याम शेलार यांची राजकीय कारकीर्द भाजपधून सुरू झाली आहे. नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काही काळ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केले. घनश्याम शेलार यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत पुन्हा त्यांनी पक्ष बदलला व शिवसेनेत गेले होते.
पक्ष सोडण्याचा निर्णय :शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेलार यांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघात उमेदवारीचे संकेत दिले होते. त्यानुसार त्यांनी सुरुवातही केली होती. मात्र, युती झाल्याने ही जागा भाजपाकडे गेली होती. त्यामूळे नाराज होऊन शेलार यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता. पुन्हा ते राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये आले होते. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कडून त्यांना अखेर विधानसभा निवडणुकीची उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी प्रतिस्पर्धी म्हणून भाजपचे बबनराव पाचपुते यांना टक्कर देऊन घनश्याम शेलार यांनी आपली राजकीय ताकद दाखवली होती. मात्र काही हजार मतांनी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. काही महिन्यापासून त्यांनी श्रीगोंदा मतदार संघात फिरायला सुरुवात केली होती.