अहमदनगर- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात रुग्ण संख्येत ४०३ ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५७, अँटीजेन चाचणीत १९५ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १५१ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २०७१ इतकी झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात रविवारी १२३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या आता ३७६२ इतकी झाली. बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १४, संगमनेर ०५, पाथर्डी ०२, नगर ग्रामीण ०१, कॅन्टोन्मेंट ०१ आणि कोपरगाव येथील ०१ रुग्ण यांचा समावेश आहे. त्यानंतर पुन्हा ३३ बाधीत रुग्ण आढळून आले. यामध्ये, नगर शहर (१५) भिस्तबाग -१, शहर -१, मिलिटरी हॉस्पिटल -१३ , अकोले १०- कळस -9, उंचखडक -1.
पारनेर ०७ - सुपा-२ पारनेर -३, राईतले-१ गंजभोयरे -1, कर्जत ०१- सुपेकरवाडी येथे रुग्ण आढळून आले.
अँटीजेन चाचणीत १९५ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा १०, संगमनेर १६, पाथर्डी २६, नगर ग्रामीण ०६, श्रीरामपूर १७ कॅन्टोन्मेंट १२, नेवासा २०, श्रीगोंदा १७, पारनेर १०, अकोले ०४, शेवगाव १२, कोपरगाव ३७, जामखेड ०३ आणि कर्जत ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.