महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'अहमदनगर जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी'

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडणुकीतसुद्धा महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला असल्याची भावना आमदार रोहित पवार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.

आमदार रोहित पवार
आमदार रोहित पवार

By

Published : Jan 1, 2020, 10:32 AM IST

Updated : Jan 1, 2020, 10:43 AM IST

अहमदनगर- राज्यात यशस्वी झालेला शिवसेना, काँगेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचा प्रयोग मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर अहमदनगर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडणुकीत सुद्धा यशस्वी झाला असल्याची भावना आमदार रोहित पवार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.

'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधींशी बोलताना आमदार रोहित पवार


2019 च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागत असतानाच रोहित यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना महाविकास आघाडीचे सर्वप्रथम सूतोवाच केले होते. तोच फॉर्म्युला आता राज्यभर समोर येत असून त्या माध्यमातून भाजपचा सुसाट वारू थोपवण्यात यश येत आहे. त्याचीच एक प्रचिती आता अहमदनगर जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीत आली. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी चमत्काराची भाषा करत जिल्हा परिषदेत भाजपचा उमेदवार निवडून येईल, यासाठी प्रयत्न केले होते. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादीने ऐनवेळी गटनेते बदलून निवडणूकीची सूत्रे आपल्या हातात घेतल्याने व्हीप विरोधात जाऊन मतदान केल्यास सदस्यत्व जाण्याच्या भीतीने आणि संख्याबळ जुळवता न आल्याने अखेर विखे गटाने काँग्रेससोबत राहण्याचा निर्णय घेतला. एकूणच हे यश महाविकास आघाडीचे असल्याचे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा - नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लाखो भाविक साई चरणी

कार्यकर्ते नाराज, मी नाही -रोहित पवार

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने मी नाराज नसल्याचे स्पष्टीकरण आमदार रोहित पवार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिले. मात्र, कार्यकर्त्यांचा हिरमोड होत असतो असेही त्यांनी सांगितले. असे असले तरी पक्ष सांगेल ती जबाबदारी आपण एक कार्यकर्ता या नात्याने पार पाडू, असे पवार यांनी सांगितले.

हेही वाचा - नगर जिल्हा परिषद निवडणूक; 'विजय' थोरातांचा...काँग्रेसने डावलल्याचा शालिनी विखेंचा आरोप

Last Updated : Jan 1, 2020, 10:43 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details