अहमदनगर - कोरोना संकटात मात करण्यासाठी प्रशासन पातळीवर विविध उपाययोजना सुरू आहेत. त्यातच अनेकजण कोरोना योद्धे म्हणून आपले कर्तव्य चोखपणे पार पाडताहेत. तर, काहीजण घरातच राहून आपले कर्तव्य बजावत आहेत. अशातच लॉकडाऊन काळात घरात राहून हातातील वेळ उपयोगात आणत एका युवकाने, ‘ऑटोमॅटिक हॅन्ड हायजिन सॅनिटायझर यंत्रा’चा शोध लावला आहे. ग्रामीण भागातील संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथे वास्तव्यास असणारे इंजिनियर अशोक चांगदेव कहांडळ या युवकाने लॉकडाऊनचा सदुपयोग करून अवघ्या 1 हजार 500 रुपयामध्ये स्वच्छता करण्यासाठी हॅन्ड हायजिन सॅनिटायझर अशा अत्याधुनिक आटोमॅटिक मशीनची निर्मिती केली आहे.
संगमनेर तालुक्यातील युवकाने तयार केले स्वस्तातील 'ऑटोमॅटिक हॅन्ड हायजिन यंत्र'
संगमनेर तालुक्यातील देवकौठे येथील एका युवकाने आपल्या गोरगरीब बांधवांसाठी अवघ्या पंधराशे रुपयांमध्ये हॅन्ड हायजिन मशीन बनवले आहे. या मशीनचा उपयोग प्रत्येक घरांमध्ये, विविध कंपन्यांमध्ये, हॉटेल व्यावसायीक दुकाने यांच्यामध्ये करण्यात येऊ शकतो. घरगुती ड्रमपासून हे मशीन तयार करण्यात आले असून यामध्ये साबण फेस व पाण्याचा वापर केला आहे. याची कार्यपद्धती पूर्णपणे सेन्सर पद्धतीने केली असून नळाखाली आपले दोन्ही हात धरल्यानंतर मशीन चालू होते.
संगमनेर तालुक्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या देवकौठे या खेड्यातील तरुण अभियंता अशोक चांगदेव कहांडळ याने आपल्या गोरगरीब बांधवांसाठी अवघ्या पंधराशे रुपयांमध्ये हॅन्ड हायजिन मशीन बनवले आहे. या मशीनचा उपयोग प्रत्येक घरांमध्ये, विविध कंपन्यांमध्ये, हॉटेल व्यावसायीक दुकाने यांच्यामध्ये करण्यात येऊ शकतो. घरगुती ड्रमपासून हे मशीन तयार करण्यात आले असून यामध्ये साबण फेस व पाण्याचा वापर केला आहे. याची कार्यपद्धती पूर्णपणे सेन्सर पद्धतीने केली असून नळाखाली आपले दोन्ही हात धरल्यानंतर मशीन चालू होते. यामध्ये हात मशीनपुढे धरताच पहिले ५ सेकंद भरून येणाऱ्या पाण्याने हात ओले होतील. पुढील पाच सेकंदात सोपफेस हातावर येतो. १५ सेकंद हात दोन्ही बाजूने व्यवस्थित स्वच्छ केल्यानंतर येणाऱ्या २० सेकंदामध्ये डावा आणि उजवा हात वेगवेगळ्या ड्रायर समोर पकडून कोरडा होईल. अशाप्रकारे अत्यंत कमी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट म्हणजेच फक्त पंधराशे रुपये आणि अर्धा लिटर पेक्षाही कमी पाण्यात पूर्णपणे हात धुऊन होतात.
उपलब्ध असलेल्या बेसिनच्या भांड्यावरचा जुना नळ खुलून त्या जागेवरच फिट होते त्यामुळे नवीन पाईप कनेक्शनची गरज नाही. तसेच, याची संपूर्ण बॉडी प्लास्टिकचे असल्याने शॉकप्रूफ आहे. सिंगल पॉवरपॉईंट कनेक्शन गरजेचे संपूर्ण बॉडी डिसमेंटल होत असल्याने कुठेही एका छोट्याशा बॅगमध्ये नेता येते. तर, संपूर्ण इंस्टॉलेशनसाठी फक्त पाच मिनिटे इतका वेळ लागतो. एक व्यक्ती हात धूत असताना दुसऱ्या व्यक्तीने मध्येच हात घातल्यास सायकल डिस्टर्ब होत नाही, पूर्ण एक मिनिट चालते. दोन लिटरचा सोप टॅंक असल्याने रिफिलिंग टाईम दर 24 तासांनी करावा लागतो. अशोक चांगदेव कहांडळ हा अमृतवाहिनी तंत्रनिकेतनचा माजी विद्यार्थी असून त्याने मेकॅनिकल विभागातून पदविका संपादन केली आहे. सध्या तो नाशिक जिल्ह्यातील शिंदे एमआयडीसीत युनी डेरिटेंड लिमिटेड कंपनीत कार्यरत आहे. त्याने बनवलेल्या उपकरणाचा ग्रामीण व मध्यमवर्गीय माणसाला मोठा फायदा होणार आहे.