अहमदनगर - जिल्ह्यातील शेवगाव येथील बाजारपेठेत नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. काही दुकानांना स्वतःची पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असतो. त्यामुळे अशा दुकानांनी पार्किंगची व्यवस्था करावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय राजे भोसले यांनी शेवगाव तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे उपोषण केले.
दुकानांनी स्वतःची पार्किंग व्यवस्था करावी, शेवगाव येथे नागरिकाचे एकदिवसीय उपोषण
लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर नागरिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. तसेच कापड दुकानांमध्ये देखील गर्दी होत आहे. बाजारपेठेतील वधवा कलेक्शन, बब्जी कलेक्शन, राठी मेडीकल आदी दुकानांना स्वतःची पार्किंगची व्यवस्था नाही. तसेच गाड्यांची बेशिस्तीत पार्किंग केली जाते. याकडे नगरपरिषदेचे देखील दुर्लक्ष करत आहे.
लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर नागरिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. तसेच कापड दुकानांमध्ये देखील गर्दी होत आहे. बाजारपेठेतील वधवा कलेक्शन, बब्जी कलेक्शन, राठी मेडीकल आदी दुकानांना स्वतःची पार्किंगची व्यवस्था नाही. तसेच गाड्यांची बेशिस्तीत पार्किंग केली जाते. याकडे नगरपरिषदेचे देखील दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे बाजारपेठेत कायस्वरुपी वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्यामुळे अशा बेशिस्त दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी संजय राजे भोसले यांनी केली आहे.