अहमदनगर -राहता तालुक्यातील जळगाव येथील शेतकरी अरुण चौधरी यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडला ( Leopard Fell Well in rahata ahmednagar ) होता. हा बिबट्या भक्षाचा पाठलाग करतांना विहिरीत पडला असावा असा प्राथमिक अंदाज ग्रामस्थांनी वर्तवला आहे. तब्बल चार तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करत विहिरीतून सुखरूपपणे बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले आहे.
भक्षाचा नादात बिबट्या पडला विहिरीत -
राहाता तालुक्यात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर मोठा प्रमाणात वाढत असल्याचे पहिला मिळत आहे. भक्षाचा पाठलाग करत असतांना राहाता तालुक्यातील जळगाव येथील शेतकरी अरुण चौधरी यांच्या शेतीतील विहिरीत बिबट्या पडलाय. हा बिबट्या रात्रीच्या सुमारास भक्षाचा पाठलाग करत असताना विहिरीत पडला असावा असा अंदाज शेतकऱ्यांनाकडून वर्तवली जात आहे. आज सकाळी शेतकरी अरुण चौधरी हे आपल्या शेतीला पाणी देण्यासाठी मोटार चालू करण्यासाठी गेले असतांना त्यांना विहिरीतून आवाज ऐकू आला म्हणुन त्यांनी विहिरीत डोकुवून पाहिले तर विहिरीतील मोटारीच्या लाकडावर बिबट्या दिसला. यानंतर चौधरी यांनी गावातील ग्रामस्थांना तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बिबटयाची माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनासह घटनास्थळी दाखल झाले.