महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगर एमआयडीसीला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती

अहमदनगर येथील एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले असून ती रस्त्याला लागून असल्याने पाण्याचे फवारे रस्त्यावरील वाहनांवर उडत आहेत. यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा थांबविण्यात आला असून यात लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.

By

Published : Aug 20, 2019, 8:35 PM IST

एमआयडीसीला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती

अहमदनगर - येथील एमआयडीसीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले आहे. पाईपलाईन नेमकी कशाने फुटली हे निश्चित कळू शकलेले नाही. जलवाहिनी रस्त्यालगत असल्यामुळे पाण्याचे मोठे फवारे रस्त्यावरील येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवर उडत असल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे.

एमआयडीसीला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला गळती


या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा थांबविण्यात आला आहे. त्यानंतर दुरुस्ती करण्यात येणार आहे. या जलवाहिनीतून नगर एमआयडीसीला पाणी पुरवठा होत असतो. एमआयडीसीतील अनेक प्लांटला कुलिंग आणि इतर गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. मात्र, नेमकी हीच जलवाहिनी फुटल्याने पाणी प्रवाह बंद करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक प्लांटवर याचा परिणाम झाला आहे. यात हजारो लिटर पाणीही वाया गेले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details