महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

श्रीगोंदामध्ये अवैध वाळू कारवाईत ४० लाख रुपये किमतीच्या 8 बोटी नष्ट

भविष्यात देखील वाळू उपसा सुरू असल्यास त्यावर अशाच पद्धतीने कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा तहसीलदार माळी यांनी दिला आहे.

श्रीगोंदामध्ये अवैध वाळू कारवाईत ४० लाख रुपये किमतीच्या 8 बोटी नष्ट

By

Published : Nov 6, 2019, 10:22 PM IST

अहमदनगर -श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज, आर्वी, पेडगाव या परिसरात बोटीच्या साहाय्याने अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र माळी यांच्या पथकाने एकूण 8 बोटी नष्ट केल्या आहेत. पथक आलेले पाहताच येथील कामगार बोटी सोडून पळून गेले. त्यामुळे या बोटी ताब्यात घेऊन डिटोनेटरच्या साहाय्याने जागेवरच ब्लास्ट करण्यात आल्या.

श्रीगोंदामध्ये अवैध वाळू कारवाईत ४० लाख रुपये किंमतीच्या 8 बोटी नष्ट

हेही वाचा -प्रदूषणाच्या संकटाबाबत विदेशी राजनैतिक प्रमुख करणार परराष्ट्र मंत्रालयाशी चर्चा

या पथकात पेडगाव येथील मंडळ अधिकारी आजबे, मंडळ अधिकारी प्रशांत सोनवणे, लिपिक सतीश घोडेकर, पोलीस कॉन्स्टेबल दादा टाके, उत्तम राऊत, प्रताप देवकाते, किरण बोराडे कर्मचारी सहभागी होते. भविष्यात देखील वाळू उपसा सुरू असल्यास त्यावर अशाच पद्धतीने कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा तहसीलदार माळी यांनी दिला आहे. आज केलेल्या कारवाईत नष्ट करण्यात आलेल्या बोटींची किंमत चाळीस लाख रूपये इतकी आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details