अहमदनगर - माजी महापौर संदीप भानुदास कोतकर याला केडगाव येथील शिवसेनेच्या पदाधिकार्यांच्या दुहेरी हत्याकांडात जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी सशर्त जामीन मंजूर केला आहे. यासंदर्भात अॅड. महेश तलवे आणि अॅड. व्ही. आर. म्हस्के यांनी माहिती दिली.
अहमदनगरमधील दुहेरी हत्याकांड; माजी महापौर संदीप कोतकर यांना जामीन
केडगाव येथील दुहेरी हत्याकांडाचा कट रचल्याच्या संशयावरून संदीप कोतकर याला सीआयडीने अटक केली होती. या गुन्ह्यात पोलीस कोठडीनंतर संदीप हा न्यायालयीन कोठडीत होता.
केडगाव येथील दुहेरी हत्याकांडाचा कट रचल्याच्या संशयावरून संदीप कोतकर याला सीआयडीने अटक केली होती. या गुन्ह्यात पोलीस कोठडीनंतर संदीप हा न्यायालयीन कोठडीत होता. जिल्हा न्यायालयात संदीप कोतकर याच्या जामीन अर्जावर गुरूवारी सुनावणी पूर्ण झाली. जिल्हा न्यायाधीश एस. आर. जगताप यांच्यासमोर ही सुनावणी पूर्ण झाली. सुनावणीनंतर संदीप कोतकर याला न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्याबरोबरच जिल्हा बंदीची अट आणि साक्षीदारांना न भेटण्याची अट जामिनमध्ये आहे.
हेही वाचा -'जळगावमध्ये महाविकास आघाडीचा फॉर्म्युला चालू देणार नाही'
TAGGED:
अहमदनगरमधील दुहेरी हत्याकांड