महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नगरच्या जिल्हा रुग्णालयात भीषण आगीत 11 जण दगावले, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर

जिल्हा रुग्णालयातील कोरोना आयसीयू वार्डाला भीषण आग लागल्याचे वृत्त आहे. या आगीत 11 दगावल्याची माहिती समोर येत आहे.

By

Published : Nov 6, 2021, 12:11 PM IST

Updated : Nov 6, 2021, 5:05 PM IST

अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातील कोरोना आयसीयू वॉर्डला आग; 10 जण दगावले!
Fire at ICU department of Ahmednagar district hospital Six people died

अहमदनगर - जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आज सकाळी अकराच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमध्ये या ठिकाणी असलेल्या सतरा रुग्णांपैकी यातील किमान 11 रुग्ण हे दगावले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जिल्हाधिकारी डॉ भोसले यांनी दहा मृत्यू झाल्याला पुष्टी दिली आहे. पण हा आकडा वाढण्याची भीती आहे. सूत्रांच्या माहिती नुसार 11 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. या आयसीयू वार्डात 17 कोरोना रुग्ण होते.

अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयातील कोरोना आयसीयू वॉर्डला आग

सतरा रुग्णांना इतरत्र हलवले -

ही आग कशामुळे लागली याबाबत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी ही अद्यापर्यंत माहिती दिलेली नाही. आग शॉर्टसर्किटने लागल्याचे बोलले जात आहे. ही आग पूर्णपणे विझवण्यात आली असून या आयसीयू कक्षात असलेले सतरा रुग्णांना इतरत्र हलवण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले.

कोरोना आयसीयू वॉर्डला लागलेली आग आटोक्यात....

11 जणांचा मृत्यू -

या घटनेत 4 महिला, सात पुरूष असे मिळून एकूण 11 जणांचा मृत्यू झाला आहे. अद्याप एका पुरूषाची ओळख पटलेली नाही. यापैकी काही जणांची नावे -

  • रामकिशन विठ्ठल हरपुडे
  • सिताराम दगडू जाधव
  • सत्यभामा शिवाजी घोडेचौरे
  • कडूबाई गंगाधर खाटीक
  • शिवाजी सदाशिव पवार
  • कोंडाबाई मधुकर कदम
  • आसराबाई गोविंद नागरे
  • शबाबी अहमद सय्यद
  • दीपक विश्वनाथ जडगुळे
    धुराचे लोट

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत

अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केली आहे. घटनेची चौकशी करून आठवडाभरात अहवाल सादर करण्याचे आदेश डीसींना दिले आहेत असे त्यांनी सांगितले.

रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश -

घटनास्थळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, इतर पोलीस वरिष्ठ अधिकारी, शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स अधिकारी त्या ठिकाणी हजर असून जखमी झालेल्या रुग्णांना इतरत्र हलवण्यात आले आहे. हे सर्व रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिक असल्याची माहिती मिळत आहे. एकंदरीत ही आग का लागली आणि किती रुग्णांचा मृत्यू झाला आणि असेल तर याला जबाबदार कोण याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सध्या जिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहावयास मिळत आहे.

आमदार संग्राम जगताप यांनी घटनास्थळी भेट -

या आगीस आणि मृत्यूस जबाबदार अधिकारी, डॉक्टर, महानगरपालिका ऑडिट तापसणारे अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. कोरोनाची तिसरी लाट ही डिसेंबर अखेर तोंडावर सांगितली जात असताना जिल्हा रुग्णालयात आयसीयूला आग लागणे हे गंभीर असल्याचे शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर सांगितले.

भीषण आगीचा व्हिडिओ -

घटनास्थळाचे फोटोज आणि व्हिडिओ समोर आले असून यात रुग्णांच्या नातेवाईकांचे रडण्याचे आणि ओरडण्याचे आवाज स्पष्टपणे एकू येत आहेत. तसेच संपूर्ण रुग्णालयात धुराचे लोट पसरल्याचे दिसत आहे. व्हिडिओ पाहून ही आग किती भीषण होती याचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली आहे याची माहिती मिळू शकलेली नाही.

हेही वाचा -नगरमध्ये रुग्णालयाला आग; जाणून घ्या यापूर्वी कुठे कुठे घडल्या होत्या अशा घटना...

Last Updated : Nov 6, 2021, 5:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details