अहमदनगर Gautami Patil : 'सबसे कातील गौतमी पाटील' नेहमीच चर्चेत असते. गणोशोत्सवानिमित्तानं अनेक ठिकाणी गौतमीचे कार्यक्रम पार पडले. गौतमीच्या कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दीही असते. मात्र, अहमदनगरात गौतमी पाटीलचा कार्यक्रम घेणं आयोजकांना चांगलंच महागात पडलं आहे. कारण कार्यक्रम आयोजित करणाऱ्या मंडळासह गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अहमदनगरमधील तोफखाना पोलीस ठाण्यात गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आला. रस्त्यावर मंडप टाकून रहदारीस अडथळा होईल, अशा प्रकारे गौतमी पाटीलचा कार्यक्रम घेतल्याबद्दल गणपती मंडळाच्या अध्यक्षांसह गौतमी पाटील आणि तिच्या मॅनेजर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (FIR on Gautami Patil in Ahmednagar )
काय आहेनेमकं प्रकरण : अहमदनगर शहरातील पाईपलाईन रोडवर २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी मृत्युंजय प्रतिष्ठान गुलमोहर रोड आणि एकदंत मित्र मंडळ यांच्या वतीनं गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमाला पोलीस प्रशासनानं परवानगी नाकारली होती. मात्र तरीही हा कार्यक्रम झाल्यामुळं पोलिसांनी गौतमी पाटील, तिचा स्वीय सहाय्यक अशोक खरात आणि कार्यक्रमाचे आयोजक असलेले मृत्युंजय प्रतिष्ठान आणि एकदंत मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल सांगळे, आनंद कैलास नाकाडे, हर्षल किशोर भागवत यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.