अहमदनगर (शिर्डी)- राज्यातील शाळा ( Schools In Maharashtra ) सुरू करताना मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले असून, सरकारचे सातत्याने शाळांवर लक्ष आहे. काही ठिकाणी विद्यार्थी पाॅझेटिव्ह ( Students Covid Test Positive ) सापडले आहेत. त्यामुळे सरकार सरसकट शाळा बंद करण्याचा निर्णय घेणार नाही, तर स्थानिक प्रशासनाला शाळा सुरू किंवा बंद ठेवण्याचे अधिकार दिले ( Schools Closing Rights to Local Authorities ) असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ( Education Minister Varsha Gaikwad ) यांनी सांगितले.
सरसकट शाळा बंद करणार नाहीच, बंद ठेवण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला : वर्षा गायकवाड सरसकट शाळा बंद नाही
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत आज संगमनेर शहरातील विविध विकास कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा पार पडलाय. ओमायक्राॅनच्या वाढत्या संकटात शाळा सुरू ठेवायच्या कि बंद ठेवायच्या हा अधिकार स्थानिक प्रशासनाला दिला आहे. राज्य सरकार सरसकट शाळा बंदचा निर्णय घेणार नसल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हणटलंय.
महिला आरक्षण, सुरक्षेकडे लक्ष द्या
केंद्र सरकार मुलीच्या लग्नाचे वय 21 करण्याच्या विचारात आहे. मात्र, महिला आरक्षण, सुरक्षा याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तुम्हाला जर हे करायचं असेल तर करा, मात्र महिलांचे इतर प्रश्न सोडवा असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केंद्र सरकारला केलंय.