महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shirdi Saibaba : दिवाळीच्या सुट्टीत साईभक्तांचा शिर्डीकडे ओढा, तीन दिवसात तीन लाख भाविकांनी घेतले दर्शन

दिवाळीच्या सुट्यामुळे साईबाबांच्या शिर्डीत भाविकानी मोठी गर्दी ( Big crowd of devotees in Shirdi ) केलीय. काल एक लाखाहुन अधिक भाविक साई समाधीवर नतमस्तक झालेय. तर आज आणि उद्या या दोन दिवसात तब्बल 2 लाख भाविक साई समाधीचे दर्शन घेणार असल्याच अंदाज लावला जात आहे.

By

Published : Oct 29, 2022, 3:18 PM IST

Shirdi Diwali
Shirdi Diwali

शिर्डी : दिवाळीच्या सुट्यामुळे साईबाबांच्या शिर्डीत भाविकांनी मोठी गर्दी ( Big crowd of devotees in Shirdi ) केली आहे. काल एक लाखाहुन अधिक भाविक साई समाधीवर नतमस्तक झालेय. तर आज आणि उद्या या दोन दिवसात तब्बल 2 लाख भाविक साई समाधीचे दर्शन घेणार असल्याचा अंदाज लावला जात( shirdi saibaba sansthan ) आहे.

शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी :दिवाळीच्या आणि शनिवार रविवारच्या सलग सुट्ट्या लागून आल्याने भाविकांची मोठी गर्दी शिर्डीत झालेली पहायला मिळत आहे. भक्तांच्या गर्दीने साई मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते फुलून गेले आहेत. साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून भक्तांना साई दर्शनासाठी किमान एक ते दोन तास रांगेत उभे राहवा लागत आहेत.

दिवाळीच्या सुट्टीत साईभक्तांचा शिर्डीकडे ओढा, तीन दिवसात तीन लाख भाविकांनी घेतले दर्शन

तीन दिवसात तीन लाख भाविकांचे दर्शन :शुक्रवार शनिवार आणि उद्या रविवार असल्याने या तीन दिवसात तब्बल तीन लाख भाविक साईबाबांचे दर्शन घेणार असल्याचा अनुमान लावला ( three lakh devotees took darshan ) जात आहे. आज देशभारातून लाखो भाविक साईबाबांचा दर्शनासाठी शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत. या सुट्यामध्ये शिर्डीला येणाऱ्या भक्तांचा ओघ लक्षात घेता साईबाबा संस्थानच्यावतीने भाविकांच्या दर्शनाची आणि जेवणाची तसेच निवासाची चोख व्यवस्था केली असून त्याच बरोबर भक्तांच्या सुरक्षेचीही काळजी घेतली जात आहे. भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने भाविकांना कमी वेळात साईबाबांचे दर्शन मिळावेयासाठी साई संस्थान सुरक्षा प्रमुख अण्णासाहेब परदेशी प्रयत्न करत आहेत. त्याच बरोबर भाविकांनाच्या सुरक्षीततेसाठी चोख बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

व्यवसायीकांना मोठा दिलासा : भाविकांची ही गर्दी खऱ्या अर्थाने दिवाळी आधी होण्याची अपेक्षा शिर्डीतील व्यवसायीकांना होती. मात्र दिवाळीच्या सुट्ट्या शेवटी भाविकांची गर्दी वाढली आहे. शिर्डीत वाढलेल्या गर्दीने शिर्डीतील व्यवसायकाना मोठा दिलासा ( devotees crowd relief for businessman ) मिळणार असल्याचे शिर्डीतील व्यवसायीकांनी रविंद्र गोंदकर यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details