शिर्डी ( अहमदनगर ) :साईबाबांच्या तीन दिवसीय रामनवमी उत्सव ( Shirdi Ram Navami Utsav ) काळात भाविकांनी तब्बल 4 कोटी 57 लाख रुपयांचे विक्रमी दान साई संस्थानला दिले ( Four Crore Donation To Shirdi Saibaba ) आहे. याच दरम्यान ३ लाख भाविकांनी दर्शन ( 3 lakh devotees took Sai Darshan ) घेतले. यातील खास दान म्हणजे विविध देशातील तब्बल 12 लाख रुपयांचे दानही विदेशी भाविकांनी दिले आहे. कोरोनानंतर नव्या आर्थिक वर्षात एप्रिल महीन्यातील हे पहिलं मोठं दान असल्याची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत ( IAS Bhagyashri Banayat ) यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना दिली आहे.
१११ वा राम नवमी उत्सव : साईबाबांच्या शिर्डीत 9 एप्रिल ते 11 एप्रिल दरम्यान 111 वा रामनवमी उत्सव साईबाबा संस्थानच्यावतीने साजरा करण्यात आला. कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे उठल्यानंतर साजरा झालेला हा पहिला उत्सव असल्याने शिर्डीत जवळपास तीन लाखाच्यावर भाविकांनी गर्दी केली होती. या तीन दिवस भाविकांच्या गर्दीने रस्ते फुलून गेले होते. भाविकांनी केलेल्या मोठ्या गर्दीने या तीन दिवसात साई चरणी विक्रमी दान टाकल. तीन दिवसात तब्बल 4 कोटी 57 लाखाची देणगी साई चरणी अर्पण केली आहे. यात रोख रक्कम ही 4 कोटी लाख 26 लाख इतकी आहे. याच बरोबरीने सोळा लाख रुपयाचे सोने तर चार लाख पन्नास हजाराची चांदी आणि अकरा लाख रुपयांचे परकीय चलन प्राप्त झाले आहे. उत्सवानंतर दान पेट्यातील रकमेची मोजदाद झाल्याची माहिती साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे.